Maharashtra Premier League 2024 : दुसऱ्या पर्वासाठी रत्नागिरी जेट्सच्या जर्सीचे अनावरण…

Maharashtra Premier League 2024 :- महाराष्ट्र प्रिमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी गतविजेत्या रत्नागिरी जेट्स संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी रत्नागिरी जेट्स संघाचे मालक व जेटसिंथेसिस कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजन नवानी, कंपनीचे वित्त संचालक राकेश नवानी, सह संघमालक महिंद्र लुल्ला, फ्लिटगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर, रत्नागिरी जेट्सचे सीईओ प्रफुल चंदावरकर, प्रशिक्षक रणजीत पांडे, कर्णधार अझिम काझीसह सर्व खेळाडू उपस्थित होते.
दुसऱ्या पर्वाच्या मोहिमेस रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets) संघ २ जून रोजी कोल्हापूर टस्कर्स बरोबरच्या लढतीने सुरुवात करणार आहे. या दोन संघातच पहिल्या पर्वाची अंतिम लढत झाली होती.जर्सीवर कोरण्यात आलेली सोनेरी रंगाची जेट्स आमच्या संघात असलेली गतीशील उर्जा आणि सामर्थ्याचे दर्शन घडवते. आम्ही संघाला शुभेच्छा देतो, असे रत्नागिरी जेट्स संघाचे मालक राजन नवानी यांनी सांगितले.
सचिन सागा रियल क्रिकेट आणि स्कायईस्पोर्ट्स, डिजिटल एंटरटेन्मेंट आणि वेलनेस अशा नावाने कंपनीने ई-स्पोर्टससारख्या महत्वाच्या क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर पदार्पण केले आहे. रत्नागिरी जेट्स संघ आपल्या भागात क्रिकेट तळागाळात रुजविण्यासाठी कटिबद्ध आहे. जेट्स क्लबच्या एकत्रित प्रयत्नांना याचे श्रेय जाते. संघाकडे वरिष्ठ खेळाडूंबरोबरच १४, १६, १९ आणि २३ वर्षांखालील गटातील खेळाडूंनाही करारबद्ध करण्यात आले आहे.
MPL 2024 : आत्मविश्वास व अथक परिश्रम हाच यशाचा मार्ग – ऋतुराज गायकवाड
क्रांती डिस्ट्रिब्युटर्स हे संघाचे सह संघमालक असून फ्लिटगार्ड फिल्ट्रम कंपनी हे प्रायोजक आहेत. अझिम काझीच्या नेतृत्वाखालील संघात अभिषेक पवारसह अखिलेश गवळे, धीरज फटांगरे, दिव्यांग हिंगणेकर, किरण चोरमले, क्रिश शहापूरकर, कुणाल थोरात, निखिल नाईक, निकित धुमाळ, पियुष कमल, प्रदीप दाढे, रोहित पाटील, साहिल चुरी, संग्राम भालेकर, सत्यजीत बच्छाव, तुषार श्रीवास्तव, वैभव चौघुले, विजय पवळे, यश बोरकर, योगेश चव्हाण यांचा समावेश आहे.
रत्नागिरी जेट्स विरुद्ध…
2 जून : कोल्हापूर टस्कर्स (सा. 7 वा.)
4 जून : ईगल नाशिक टायटन्स (दु. 2 वा.)
5 जून : छत्रपती संभाजी किंग्स (सा. 7 वा.)
6 जून : रायगड रॉयल्स (सा. 7 वा.)
8 जून : पुणेरी बाप्पा (दु. 2 वा.)
9 जून : कोल्हापूर टस्कर्स (दु. 2 वा.)
11 जून : ईगल नाशिक टायटन्स (सा. 7 वा.)
12 जून : छत्रपती संभाजी किंग्स (सा 7 वा.)
14 जून : रायगड रॉयल्स (दु. 2 वा.)
16 जून : पुणेरी बाप्पा (सा. 7 वा.)





