\n

रत्नागिरीचे सलामीचे फलंदाज कर्णधार अझीम काझी(८), दिव्यांग हिंगणेकर(४), सत्यजीत बच्छाव(५) हे झटपट बाद झाले. अझीमला मुकेश चौधरीने झेल बाद करून रत्नागिरी संघाला पहिला धक्का दिला. हरी सावंतने त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर पाठोपाठ दिव्यांग हिंगणेकरला हरी सावंतने पायचीत बाद केले. रत्नागिरीने पहिल्यांदाच सत्यजीतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरविले. पण हा बदल यशस्वी ठरला. समाधान पांगरेने सत्यजीतला झेल बाद केले.

\n

आक्रमक फटके मारण्याच्या प्रयत्नात धीरज फटांगरे २७ धावावर बाद झाला. किरण चोरमले व अभिषेक पवार यांनी पाचव्या विकेटसाठी २८चेंडूत ४४ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. किरण चोरमलेने २३चेंडूत ३५धावांची संयमी खेळी केली. त्यात त्याने ३चौकार व २षटकार मारले. त्याला अभिषेक पवारने २२चेंडूत ३षटकारासह २८धावांची खेळी करून साथ दिली. हे दोघेही आक्रमक फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाले. त्यानंतर निखिल नाईकने २५चेंडूत ३चौकार व १षटकाराच्या नाबाद ३६धावांची खेळी करून संघाला १६० धावांचे आव्हान उभे करून दिले.

\n

१६० धावांचा पाठलाग करताना ईगल नाशिक टायटन्स संघाला २० षटकात ९बाद १३६धावाच करता आल्या. रत्नागिरी जेट्सच्या सत्यजीत बच्छाव(४-३१), दिव्यांग हिंगणेकर(२-१३), कुणाल थोरात(२-१९)यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे भरवशाचे फलंदाज मंदार भंडारी(७), अर्शिन कुलकर्णी(९), साहिल पारीख(०), कौशल तांबे(९) हे स्वस्तात तंबूत परतले. टप्प्याटप्प्याने विकेट पडत राहिल्यामुळे ईगल नाशिक टायटन्स संघ ४ बाद ३३ असा बॅकफुटवर गेला. त्यानंतर मुकेश चौधरीने एकाबाजूने लढताना ३५चेंडूत २चौकार व ४षटकाराच्या मदतीने सर्वाधिक ५० धावा, अथर्व काळे १५ यांनी धावा काढून थोडासा प्रतिकार केला.

\n

रत्नागिरी जेट्सच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघातील खेळाडूंना पाठिंबा दिला. गतविजेत्या रत्नागिरी जेट्स संघाने ईगल नाशिक टायटन्सवर वर्चस्व गाजवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

\n

भविष्यात लीगचे असे अनेक यशस्वी पर्व होतील – रोहित पवार 

\n

एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, एमपीएलच्या अंतिम सामन्याने केवळ लीगच्या वाढत्या लोकप्रियतोवर शिक्कामोर्तब केले नाही, तर स्थानिक क्रिकेटप्रेमींमध्येदेखील क्रिकेट किती खोलवर रुजले आहे हे दाखवून दिले. दुसऱ्या पर्वाच्या यशाने लीगने आणखी एक मैलाचा दगड गाठला. भविष्यात लीगचे असे अनेक यशस्वी पर्व होतील. टी २० विश्वचषक स्पर्धेतील भारत वि.बांग्लादेश सामना असताना देखील अंतिम सामन्याला सुमारे ३००००पुणेकरांनी हजेरी लावून आनंद लुटला. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. तसेच, बीसीसीआयने हि स्पर्धा भरविण्यास परवानगी दिल्याने त्यांचेदेखील आभार व्यक्त करतो.

\n

स्पर्धेतील विजेत्या रत्नागिरी जेट्स संघाला करंडक व ५०लाख रुपये, तर उपविजेत्या ईगल नाशिक टायटन्स संघाला करंडक व २५लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए)चे अध्यक्ष रोहित पवार, एमसीएचे मानद सचिव ऍड. कमलेश पिसाळ, सहसचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज आणि एमपीएलचे चेअरमन सचिन मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय एमसीए ऍपेक्स पदाधिकारी कल्पना तापीकर, शुभेंद्र भांडारकर, सुहास पटवर्धन, सुनील मुथा, विनायक द्रविड, केशव वझे, राजू काणे, सुशील शेवाळे, रणजीत खिरीड, अजय देशमुख व एमसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

\n

T20 World Cup 2024 (Super 8) : अफगाणिस्तानने केला मोठा उलटफेर, 7 वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला चारली पराभवाची धूळ…

\n

\n

संक्षिप्त धावफलक –

\n

रत्नागिरी जेट्स :- २० षटकात ८ बाद १६०धावा (किरण चोरमले ३५(२३,३x४,२x६), निखिल नाईक नाबाद ३६(२५,३x४,१x६), अभिषेक पवार २८, मुकेश चौधरी ३-३०, हरी सावंत २-२५, अर्शिन कुलकर्णी १-११, समाधान पांगरे १-२२) वि.वि. ईगल नाशिक टायटन्स : २० षटकात ९ बाद १३६धावा (मुकेश चौधरी ५०(३५,२x४,४x६), अथर्व काळे १५, हरी सावंत ११, प्रशांत सोळंकी नाबाद ११, सत्यजीत बच्छाव ४-३१, दिव्यांग हिंगणेकर २-१३, कुणाल थोरात २-१९); सामनावीर – सत्यजीत बच्छाव;

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Maharashtra Premier League 2024 : रत्नागिरी जेट्सने सलग दुसऱ्या वर्षी पटकावले विजेतेपद…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/ML.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ratnagiri-jets-won-the-maharashtra-premier-league-title-for-the-second-consecutive-year#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/ML.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ratnagiri-jets-won-the-maharashtra-premier-league-title-for-the-second-consecutive-year#webpage","name":"Maharashtra Premier League 2024 : रत्नागिरी जेट्सने सलग दुसऱ्या वर्षी पटकावले विजेतेपद…","url":"https://www.dainikprabhat.com/ratnagiri-jets-won-the-maharashtra-premier-league-title-for-the-second-consecutive-year","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ratnagiri-jets-won-the-maharashtra-premier-league-title-for-the-second-consecutive-year#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/ML.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ratnagiri-jets-won-the-maharashtra-premier-league-title-for-the-second-consecutive-year#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ratnagiri-jets-won-the-maharashtra-premier-league-title-for-the-second-consecutive-year","name":"Maharashtra Premier League 2024 : रत्नागिरी जेट्सने सलग दुसऱ्या वर्षी पटकावले विजेतेपद…"}}]}}}

Maharashtra Premier League 2024 : रत्नागिरी जेट्सने सलग दुसऱ्या वर्षी पटकावले विजेतेपद…