MPL 2024 : 4-एस पुणेरी बाप्पाची छत्रपती संभाजी किंग्सवर मात…

Maharashtra Premier League 2024 (Match 28) :- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेत सतराव्या दिवशी दुसऱ्या लढतीत सचिन भोसले (४-९), रोहन खरात (३-१६) यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर ४एस पुणेरी बाप्पा संघाने छत्रपती संभाजी किंग्स संघाचा ८ गडी राखून पराभव केला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत प्ले ऑफच्या शर्यतीत ४एस पुणेरी बाप्पा संघाचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे. ४एस पुणेरी बाप्पाच्या सचिन भोसले (४-९), रोहन खरात (३-१६), विवेक शेलार (३-३०) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे छत्रपती संभाजी किंग्स संघाचा डाव १८.४ षटकात सर्वबाद ९९ धावावर संपुष्टात आला.
कर्णधार मुर्तझा ट्रंकवाला खाते न उघडताच तंबूत परतला. पुणेरी बाप्पाच्या विवेक शेलारने त्याला पायचीत बाद केले. ओम भोसले ने २३ धावा, ओमकार खाटपेने २१ धावा काढून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण रोहन खरातने ओम भोसले व ओमकार खाटपेला बाद करून छत्रपती संभाजी किंग्स संघाला एकापाठोपाठ दोन धक्के दिले. त्यानंतर दिग्विजय पाटीलच्या १९ धावा वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. हे आव्हान ४एस पुणेरी बाप्पा संघाने १४.४ षटकात २ बाद १०२ धावा करून पुर्ण केले.
यात रामकृष्ण घोषने ३५ चेंडूत १ चौकार व २षटकारासह ३५ धावांची संयमी खेळी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर यश क्षीरसागरने २४ चेंडूत नाबाद २९ धावा, सुरज शिंदेने नाबाद १८ धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.
𝗔𝗻 𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗹𝗹 𝘁𝗲𝗮𝗺 𝗲𝗳𝗳𝗼𝗿𝘁 𝗯𝘆 𝟰𝗦 𝗣𝘂𝗻𝗲𝗿𝗶 𝗕𝗮𝗽𝗽𝗮 👏
They win by 8️⃣ wickets against CSK.#MaharashtraPremierLeague2024 #ThisIsMahaCricket #T20Cricket #MPL2024 #PuneriBappa #ChhatrapatiSambhajiKings pic.twitter.com/QHeMVxd57C
— MPLT20Tournament (@mpltournament) June 17, 2024
संक्षिप्त धावफलक – छत्रपती संभाजी किंग्स : १८.४ षटकात सर्वबाद ९९ धावा. (ओम भोसले २३, ओमकार खाटपे २१, दिग्विजय पाटील १९, सचिन भोसले ४-९, रोहन खरात ३-१६, विवेक शेलार ३-३०) पराभुत वि. ४ एस पुणेरी बाप्पा : १४.४ षटकात २ बाद १०२ धावा. (रामकृष्ण घोष ३५, यश क्षीरसागर नाबाद २९, सुरज शिंदे नाबाद १८, श्रीपाद निंबाळकर १५, राजवर्धन हंगर्गेकर १-१८). सामनावीर – रोहन खरात





