Ratnagiri News : रत्नागिरीत अनंत चतुर्दशीचा उत्साह; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप
Ratnagiri News : रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन सोहळ्याचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Ratnagiri News : रत्नागिरीमध्ये अनंत चतुर्दशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने नागरिक ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मांडवी समुद्रकिनारी दाखल होत आहेत. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका वाजत-गाजत मांडवी समुद्रकिनाऱ्याकडे सरकत आहेत. (Ratnagiri News)
विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या वतीनेही मांडवी समुद्रकिनारी आवश्यक व्यवस्थापन करण्यात आलं आहे. (Ratnagiri News)
मांडवी समुद्रकिनारी निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आली असून, भाविकांनी निर्माल्य समुद्रात न टाकता संकलन केंद्रातच जमा करावं, असं आवाहन रत्नागिरी नगरपरिषदेने केलं आहे. (Ratnagiri News)





