Eknath Shinde : कर्तव्य बजावताना पोलीस अधिकारी चक्कर येऊन कोसळले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला धावले
Eknath Shinde : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ठाण्यात बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असताना पोलीस निरीक्षक संजय नलावडे अचानक चक्कर येऊन खाली कोसळले.

Eknath Shinde : ठाण्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी कर्तव्य बजावत असताना पोलीस निरीक्षक संजय नलावडे अचानक चक्कर येऊन कोसळले. ही घटना समोर घडताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः पुढाकार घेत नलावडे यांच्या मदतीला धाव घेतली. (Eknath Shinde)
ताफ्यातील रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या नलावडे यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सकाळपासूनच बंदोबस्ताच्या कर्तव्यावर तैनात होते. पोलीस निरीक्षक संजय नलावडे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासोबत कर्तव्य बजावत होते. ठाण्यातील नियोजित कार्यक्रम आटोपून उपमुख्यमंत्री शिंदे पुण्याला रवाना झाले होते. पुण्यातील कार्यक्रम आटोपून ते पुन्हा ठाण्यातील साकेत हेलिपॅडवर दाखल झाले. (Eknath Shinde)
यावेळी ताफ्यात कर्तव्यावर असलेले संजय नलावडे अचानक चक्कर येऊन खाली कोसळले. आपल्या समोरच पोलीस अधिकारी कोसळल्याचं पाहताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली. सहकाऱ्यांनी नलावडे यांना रुग्णवाहिकेत दाखल केलं होतं. त्यानंतर शिंदे यांनी रुग्णवाहिका तातडीने ज्युपिटर रुग्णालयात नेण्याच्या सूचना दिल्या. (Eknath Shinde)
एवढ्यावरच न थांबता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचा ताफा रुग्णवाहिकेच्या पुढे ठेवून तिला रुग्णालयापर्यंत पोहोचवलं. नलावडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून आवश्यक ते सर्व उपचार करण्याच्या सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या. उपचारांचा खर्चाची चिंता करू नका, आवश्यक ते सर्व उपचार करा, अशा सूचनाही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.
दरम्यान, नलावडे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे हे फोनवरून डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत आहेत. (Eknath Shinde)
गेल्याच आठवड्यात ताफ्यातील पोलीस निरीक्षक विजय सांगाडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यावेळीही शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एका पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीसाठी शिंदे यांनी तातडीने घेतलेला पुढाकार चर्चेचा विषय ठरला आहे. (Eknath Shinde)





