Satara News : बँक टिकवायची की मोडकळीस काढायची? उदयनराजेंचा जाहीर सवाल
Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी सहकार क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेपावर प्रश्न उपस्थित केला आहे.

Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी सहकार क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेपावर प्रश्न उपस्थित केला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक पक्षीय भूमिकेतून न होता पक्षनिरपेक्ष पद्धतीने व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. (Satara News)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत आपली भूमिका मांडली. (Satara News)
“ज्या-ज्या जिल्हा बँकांच्या निवडणुका राजकीय पक्षांच्या माध्यमातून लढवल्या गेल्या, त्या बँकांची आज बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे बँक टिकवायची की मोडकळीस काढायची, हा प्रश्न आहे,” असे उदयनराजे म्हणाले. (Satara News)
सहकार क्षेत्रात राजकारण येऊ नये, अशी आपली भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेची निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाच्या वतीने लढवली जाऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. (Satara News)
विशेष म्हणजे, या स्थानिक मुद्द्यावर आपण कोणत्याही राजकीय नेत्याची भेट घेणार नसल्याचे उदयनराजेंनी सांगितले. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही या निवडणुकीबाबत चर्चा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Satara News)
दरम्यान, निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी गृहनिर्माण मतदारसंघातून अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. जिल्हा बँकेत राजकारण न आणता बँकेचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (Satara News)





