Devendra Fadnavis : विरोधकांना सुबुद्धी येवो, कुबुद्धीचे विसर्जन होवो; मुख्यमंत्री फडणवीसांचे बाप्पाकडे साकडे
Devendra Fadnavis : दहा दिवसांच्या उत्साही वातावरणानंतर राज्यभरात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे.

Devendra Fadnavis : दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज राज्यभरात बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीसह प्रमुख विसर्जनस्थळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गिरगाव चौपाटीवर गणेशमूर्तींच्या विसर्जन सोहळ्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी विरोधकांबाबत केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (Devendra Fadnavis)
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील विसर्जन मिरवणुकीतील शिस्त आणि प्रशासनाच्या व्यवस्थेचे कौतुक केले. “दहा दिवस भक्तीभावाने गणरायाची पूजा केली. आज त्यांच्या विसर्जनाचा दिवस आहे. एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात दु:ख असते. पुढच्या वर्षी लवकर या, अशी विनंती आपण बाप्पाला करतो,” असे फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)
‘विरोधकांना सुबुद्धी यावी’
मुंबईत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन मिरवणुका सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नागरिकांनी सुरक्षितपणे आणि शिस्तीने गणेश विसर्जनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. (Devendra Fadnavis)
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “विरोधकांना सुबुद्धी यावी आणि कुबुद्धीचे विसर्जन व्हावे, अशी मागणी आपण बाप्पाकडे करतो.” (Devendra Fadnavis)
गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी बॅरिकेड्स, सीसीटीव्ही, सुरक्षा बोटी आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. (Devendra Fadnavis)
एकनाथ शिंदेंनीही व्यक्त केल्या भावना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वातावरणाबाबत भाष्य केले. गणेशभक्तांची मोठी गर्दी असूनही विसर्जन मिरवणुका शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (Devendra Fadnavis)
दहा दिवसांच्या उत्सवानंतर बाप्पाला निरोप देताना भक्तांच्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात दु:ख असते, असे शिंदे म्हणाले. मुंबई महापालिका, मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. दरम्यान, “बळीराजाच्या मागे सरकार खंबीरपणे उभे राहिले आहे आणि यापुढेही राहणार आहे,” असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. (Devendra Fadnavis)





