रश्मी देसाईला वयाच्या १६व्या वर्षी कास्टिंग काउचचा करावा लागला सामना

Rashami Desai | बॉलिवूडपासून टीव्हीपर्यंतचे अनेक स्टार्स कास्टिंग काउचचे शिकार ठरले आहेत. याबाबत अनेकांनी खुलासेही केले आहेत. यानंतर आता टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने देखील कास्टिंग काउचवर भाष्य केले आहे.
रश्मीला वयाच्या १६ वर्षी कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते. मुलाखतीमध्ये रश्मीने सांगितले की, “मी १६ वर्षांची असताना एका ऑडिशनला गेली होती. तेव्हा त्या व्यक्तीने ड्रिंकमध्ये ड्रग्ज टाकून मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. मी त्याला स्पष्ट बोली की मला हे करायचे नाही. तरीही तो मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता. मी शेवटी कशीतरी तिथून पळून गेले आणि स्वतःला वाचवले. ”
View this post on Instagram
पुढे रश्मी म्हणाली, “दुसऱ्या दिवशी मी माझ्या आईसोबत त्याच्याकडे पुन्हा गेले. तेव्हा आईने थेट त्याला थोबाडीत मारली होती.” असा भयानक अनुभव रश्मीला आल्याचे तिने सांगितले. ही घटना अनेक वर्षापूर्वी घडली जरी असली तरी अजूनही तिच्या मनात ती कायम आहे. Rashami Desai |
दरम्यान, टिव्ही अभिनेत्री रश्मी देसाई हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तिने अनेक हिट मालिका केल्या आहेत. रश्मीका नेहमी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ‘उतरन’ मालिकेतील तपस्याच्या भूमिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती ‘परी हूँ मैं,’ ‘रावण’ आणि ‘बिग बॉस 13’ मध्येही दिसली होती. यासोबतच तिने अनेक वेब सीरीज आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. Rashami Desai |
वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, रश्मीने २०१२ मध्ये उतरनचा को-स्टार नंदिश संधूसोबत लग्न केले. मात्र चार वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर रश्मीचे नाव अनेक स्टार्ससोबत जोडले गेले. बॉयफ्रेंड अरहान खान देखील ‘बिग बॉस 13’ मध्ये आला होता. दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि सलमानने अरहानचा पर्दाफाश केला होता. Rashami Desai |
हेही वाचा:
Sanjay Raut : मोदींनी ‘ती’ गोष्ट छातीवर हात ठेवून सांगावी; खा. संजय राऊतांनी दिले आव्हान





