Sanjay Raut : मोदींनी ‘ती’ गोष्ट छातीवर हात ठेवून सांगावी; खा. संजय राऊतांनी दिले आव्हान

मुंबई : आज दादरच्या शिवाजी पार्कवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहे.या सभेपुर्वी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी मोदींना ओपन चॅलेंज दिले आहे. शिवसेना फोडली की नाही? हे पंतप्रधान मोदींनी आजच्या सभेत छातीवर हात ठेवून सांगाव, असे आव्हान संजय राऊतांकडून देण्यात आले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
जो देश पंडित नेहरू इंदिरा गांधी यांनी घडविला. त्या देशाला मोदींनी मागील दहा वर्षात मागे नेले. तसेच मागील दहा वर्षात काय केलं याची उजळणी करण्याची संधी जर आम्हाला दिली तर बर होईल,असे देखील राऊत यांनी म्हटलं आहे.मोदींनी आजच्या सभेत छातीवर हात ठेवून सांगायचं की मुंबईचा आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली की नाही, असे चँलेज राऊतांनी पंतप्रधान मोदींना दिले आहे.
तसेच भाजपा हा जाहिरात बजरंग चालणारा पक्ष आहे. 2014 मध्ये अशाच पद्धतीचे जाहिराती करून त्यांनी यश संपादन केले होते, असा टोलादेखील संजय राऊत यांनी यावेळी भाजपला लगावला.





