धक्कादायक : पुण्यात प्रपोज नाकारले म्हणून नशेचं इंजेक्शन देऊन तरुणीवर अत्याचार!
Updated On:

पुणे – नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुळशी तालुक्यातील भुकुम मध्ये हा प्रकार घडला आहे. तरुणीने प्रपोज नाकारल्याचा राग मनात धरून हे कृत्य केले आहे.
समीर विजय भालेराव उर्फ डॉनी सिंग/रॅपर बॉय, वय २८ असे आरोपीचे नाव असून हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणा तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
आरोपी समीरने अल्पवयीन मुलीला प्रपोज केले होते. परुंतु तिने नकार दिला याचा राग मनात धरून समीरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीला नशेचे इंजेक्शन देऊन मारहाणही केली. तिच्या वडिलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही आरोपीने दिली आहे. असे तरुणीने फिर्यादीत म्हटलं आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.





