बलात्कार प्रकारणातील आरोपीची चार वर्षाच्या कारावासानंतर निर्दोष मुक्तता

पुणे : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चार वर्षांपासून कारागृहात असलेल्या तरूणाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नऊ महिन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणाचा दावा निकाली काढण्याचा आदेश उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला दिला होता.
त्यानुसार सुनावणी करत सबळ पुराव्या अभावी स्वप्नील जनार्धन सोनवणे (रा.भोर) याची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांनी दिले. बचाव पक्षातर्फे ॲड. प्रकाश चव्हाण,ॲड. अतुल गोणते,ॲड. रितेश गदादे, ॲड. सुरज संजय शिंदे,ॲड. अक्षय बडवे,ॲड. अनिश चिपाडे यांनी सादर केलेला साक्षीपुरावा ग्राह्य धरुन न्यायालयाने हा आदेश दिला.
या प्रकरणात राजगड पोलिसांनी सोनवणे याला बलात्कार व बाललैंगिक आत्याचारानुसार दाखल गुन्ह्यात अटक केली होती. या प्रकरणात पीडित सात महिण्यांची गरोदर होती. त्यामुळे सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन नाकारला होता. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावेळी हे प्रकरण नऊ महिन्यात निकाली करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला दिले होते





