Ranka Jewellers : रांका ज्वेलर्सच्या 14 व्या दालनाचा वाघोली येथे भव्य शुभारंभ !

145 वर्षाची परंपरा, सचोटी, शुध्दता, प्रामाणिकपणा, ग्राहकांशी विश्वासाचे नाते व उत्तम सेवा यामुळे पुणेकर जनतेच्या मनात व हृदयात प्रतिष्ठेचे स्थान निर्माण केलेल्या रांका ज्वेलर्स परिवाराच्या महाराष्ट्रातील १४ व्या सुवर्ण दालनाचे उदघाटन केंद्रीय राज्य मंत्री, मा.ना.श्री.मुरलीधर मोहोळ व पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार यांच्या शुभहस्ते वाघोली येथे दि.10 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न झाले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देखील नवीन दालनाला आवर्जून भेट देऊन रांका परिवाराला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रांका परिवारातील फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, डॉ. रमेश रांका, अनिल रांका, तेजपाल रांका, वस्तुपाल रांका, शैलेश रांका, श्रेयस रांका, मानव रांका, श्लोक रांका, ऋषभ रांका, विवान रांका व वाघोली परिसरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण दिवसभर अनेक मान्यवर व्यक्ती, नगरसेवक, आमदार व परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
रांका ज्वेलर्सच्या वाघोली येथील 6500 चौरस फुटांच्या या भव्य सुवर्णदालनामध्ये लेटेस्ट व हेरिटेज कलेक्शन व या दालनातील ‘विवारंभ लाऊंज’मध्ये लग्नाच्या दागिन्यांची मोठी व्हरायटीज् देखील नागरिकांना पाहावयास मिळाल्या. ग्राहकांच्या आवडीनुसार कस्टमाईज्ड् ज्वेलरी तयार करून देण्याची सोयसुद्धा केली आहे.
वाघोली येथील नवीन दालनाच्या उदघाटना निमित्त दि. 17 सप्टेंबर 2024 पर्यंत ग्राहकांना खास शुभारंभानिमित्त दागिने खरेदी करतेवेळी सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सवलत तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सवलत दिली जाणार आहे. तसेच हॉलमार्क ज्वेलरीसाठी 100% एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. वाघोली येथे नव्याने सुरू झालेल्या सुवर्णदालनात एकाच छताखाली सुवर्ण व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकारच्या पारंपारिक दागिन्यांव्यतिरिक्त आधुनिक युगातील युवक युवतींच्या पसंतीनुसार, कमी वजनाचे, योग्य किंमतीचे सोने, चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांचा स्टॉक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने वाघोली, केसनंद फाटा, केसनंद गाव, आव्हाळवाडी, लोणीकंद, पेरणेफाटा, सणसवाडी, शिक्रापूर, कोरेगाव भीमा, शिरूर, रांजणगाव या भागातील नागरिकांना खरेदीसाठी अनुकूल सोय असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
वाघोली येथे नव्याने सुरू झालेल्या सुवर्णदालनात लाईटवेट ज्वेलरी, टर्कीश ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी तसेच चांदीचे पूजेचे साहित्य, देवी देवतांच्या चांदीच्या मूर्ती व असंख्य गिफ्ट आर्टिकल्स ग्राहकांसाठी येथे उपलब्ध असणार आहेत. तसेच सर्वसामान्य जनतेला सहजरित्या परवडणारे 1 ग्रॅम सोन्याचे दागिने व भेटवस्तूंची सोय केली असून त्यासाठी स्वतंत्र दालन केले आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे इथे येणाऱ्या ग्राहकांना दागिने खरेदीचा एक वेगळा आनंदमय अनुभव मिळणार आहे.
रांका ज्वेलर्सने सन 1980 साली प्रथम स्वतःचे हॉलमार्किंग सुरू केले व आज सोन्याचे सर्व दागिने सरकारमान्य बीआयएसच्या शुद्धतेचे हॉलमार्क असून हिऱ्यांचे सर्व दागदागिने व मौल्यवान खडे देखील सुप्रसिद्ध लॅबोरेटरी कडून सर्टिफाईड करून दिले जातात. रांका परिवाराचा ज्वेलरी व्यवसाय १४५ वर्षांपूर्वी सुरू होऊन बंधूंबरोबर वाटणी झाल्यानंतर रांका ज्वेलर्सचा प्रथम प्रारंभ रविवार पेठ येथील दालनानंतर थोडयाच कालावधीत लक्ष्मी रोड, कर्वे रोड, पिंपरी चिंचवड, हडपसर, सिंहगड रोड, सातारा रोड, बंडगार्डन, बाणेर, ठाणे (मुंबई), पिंपळे सौदागर, कोंढवा, खराडी आणि आता वाघोली येथे अशी एकूण 14 दालने ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम व उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल रांका परिवाराने पुणेकरांचे मनापासून आभार मानले आहेत.





