#RanjiTrophy : मध्य प्रदेशच्या कर्णधारपदी नमन ओझा
Updated On:

इंदोर : अनुभवी क्रिकेटपटू नमन ओझावर विश्वास दाखवत मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेने त्याच्याकडे रणजी संघाचे नेतृत्व सोपवले आहे. तर, शुभम शर्मा याची संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड स्पर्धेच्या सुरूवातीच्या दोन सामन्यासाठीच आहे.
रणजी स्पर्धेदरम्यान मध्यप्रदेशचा संघ १७ डिसेंबर रोजी बडोद्याविरूध्द पहिला तर २५ डिसेंबर रोजी तामिळनाडूविरूध्द दुसरा सामना खेळणार आहे. हे दोन्ही सामने इंदोरच्या होळकर स्टेडियम होणार आहेत.
दोन सामन्यासाठीचा मध्यप्रदेशचा संघ : नमन ओझा (कर्णधार), शुभम शर्मा (उप कर्णधार), अजय रोहेरा, आदित्य श्रीवास्तव, रमीज खान, रजत पाटीदार, यश दुबे, आनंद बैस, मिहिर हिरवानी, कुमार कार्तिकेय सिंह, ईश्वर पांडे, आवेश खान, कुलदीप सेन, गौरव यादव, हिमांशु मंत्री आणि गौतम रघुवंशी.








