Arjun Tendulkar Record : वडिलांच्या पावलावर पाऊल! अर्जुन तेंडुलकरचा रणजी क्रिकेटमध्ये धमाका; सचिनचा ‘हा’ खास विक्रम मोडण्याची संधी
Arjun Tendulkar Record : अर्जुन तेंडुलकरचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५० विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे.

Arjun Tendulkar Record 50 first-class wickets : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा ही ओळख मागे सारून अर्जुन तेंडुलकर आता क्रिकेटच्या मैदानात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करताना दिसत आहे. रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामात गोवा संघाकडून खेळताना अर्जुनने महाराष्ट्र संघाविरुद्ध महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (First Class Cricket) बळींचे ‘अर्धशतक’ पूर्ण करत एका मोठ्या टप्प्याला गवसणी घातली आहे.
५० विकेट्सचा टप्पा पार; रोहन कुनूमल ठरला शिकार
महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात रोहन कुनूमलचा विकेट्स घेत अर्जुनने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपल्या ५० विकेट्स पूर्ण केल्या. २०२२-२३ च्या हंगामात राजस्थानविरुद्ध पदार्पणातच शतक झळकावून अर्जुनने आपल्या अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवली होती. आता फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही तो सातत्य राखण्याचा प्रयत्न करत आहे.
वडिलांच्या ‘त्या’ विक्रमाचा पाठलाग –
अर्जुन तेंडुलकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण केल्या.
अर्जुन तेंडुलकर आता रणजी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या एका खास विक्रमाचा पाठलाग करत आहे. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर रणजी सामन्यांमध्ये ८१ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. अर्जुनकडे आता ५० विकेट्स असून सचिनचा विक्रम मागे टाकण्यासाठी त्याला फक्त ३२ विकेट्सची गरज आहे. अर्जुन हा मुख्य गोलंदाज म्हणून खेळत असल्याने आगामी काही सामन्यांत तो आपल्या वडिलांना या बाबतीत मागे टाकू शकतो.
हेही वाचा – Australian Open 2026 : महिला दुहेरीत मर्टेन्स-झांग जोडीचा ‘ग्रँड’ धमाका! ३७ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन जोडीने मिश्र दुहेरीत रचला इतिहास
आयपीएलमध्ये नव्या रंगात दिसणार अर्जुन –
🚨 Cricbuzz Exclusive 🚨
LSG and MI are in talks over Shardul Thakur and Arjun Tendulkar.
The potential swap is likely to be treated as separate all-cash deals, not a direct trade.#IPL2026 #ArjunTendulkar #ShardulThakur pic.twitter.com/UEqo9heDwY
— Cricbuzz (@cricbuzz) November 12, 2025
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई सोडून गोव्याचा रस्ता धरलेल्या अर्जुनने आता आयपीएलमध्येही आपली वाट बदलली आहे. गेल्या काही हंगामात मुंबई इंडियन्सकडून (MI) केवळ ५ सामने खेळणाऱ्या अर्जुनला यंदा लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाने आपल्या ताफ्यात सामील केले आहे. नव्या संघात अर्जुनला किती संधी मिळणार आणि तो आपली छाप सोडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





