एक्‍स-लवर्स रणबीर कपूर-कतरीना कैफ पुन्हा एकत्रित

कधी काळी लिव-इनमध्ये राहणारे एक्‍स-लवर्स रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांचे 2016मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर त्याची खूपच चर्चा रंगली होती. यानंतर दोघेही आलेल्या परिस्थितीला सामोरे गेले आणि “जग्गा जासूस’मध्येही ते झळकले होते. तसेच कोणत्याही कार्यक्रमात भेटल्यास दोघांमधील चांगले संबंध दिसून येतात.

या हॉट कपलचे रोमांटिक रिलेशनशिप संपली असली तरी त्यांचे चाहते त्यांना स्क्रीनवर एकत्रित पाहण्यासाठी कायमच उत्सुक असतात. दरम्यान, या दोन्ही कलाकार पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. हे एक्‍स-लवर्स एका प्रोजेक्‍टमध्ये सोबत काम करणार आहेत.

मात्र, ते कोणत्या चित्रपटात नव्हे, तत एका मोबाईलच्या जाहिरातीत झळकणार आहे. तसेच त्यांच्यासोबत रॅपर बादशाह ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास रणबीर कपूर सध्या आपल्या आगामी “ब्रह्मास्त्र’मध्ये झळकणार आहे. यात त्याच्यासोबत आलिया भट्‌ट, अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, नागार्जुन आणि मौनी रॉय मुख्य भूमिका साकारत आहेत. दुसरीकडे कतरीना कैफही रोहित शेट्‌टीच्या “सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)