Pune News : राणा सूर्यवंशी रुग्णालयातून गायब; पोलिसांच्या चौकशीपूर्वीच घेतला डिस्चार्ज?
Pune News : बारामती विमानतळ परिसरात स्वतःवर गोळीबार झाल्याचा दावा करून चर्चेत आलेले राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्याभोवती संशयाचे जाळे अधिकच घट्ट झाले आहे.

Pune News : स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव केल्याचा संशय असलेल्या राणा सूर्यवंशी याच्याबाबत नाट्यमय घडामोडी समोर येत आहेत. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. (Pune News)
या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी पोलीस रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तो तेथून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राणा सूर्यवंशी रुग्णालयातून नेमका कुठे गेला, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Pune News)
राणा सूर्यवंशी याने स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचा संशय पोलिसांच्या तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. स्वतःला पोलीस संरक्षण मिळवण्यासाठी किंवा अन्य वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी हा कथित कट रचण्यात आला होता का, या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती आहे. (Pune News)
दरम्यान, राणा सूर्यवंशी हा रुग्णालयातून फरार झाल्याची चर्चा असली, तरी त्याने डिस्चार्ज घेतला असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या रुग्णालयातून जाण्याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळणे आवश्यक आहे. त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता की तो पोलिसांच्या चौकशीपूर्वीच निघून गेला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. (Pune News)





