Ramiz Raja Kissing : PSL 2026 मध्ये मोठा वाद; कॉमेंट्री बॉक्समध्ये रमीझ राजाने लिसा स्थळेकरला केलं किस, VIDEO होतोय व्हायरल!
Ramiz Raja Kissing : लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू असतानाच रमीझ राजा यांनी लिसा यांना मिठी मारत किस केल्याची घटना घडली.

Ramiz Raja hugging and kissing Lisa Sthalekar Video Viral : पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२६ सध्या विविध कारणांमुळे सातत्याने वादात सापडत आहे. कधी चेंडूचा रंग बदलणे, तर कधी बॉल टॅम्परिंगचे आरोप यामुळे ही लीग चर्चेत राहिली आहे. अशातच आता या स्पर्धेतील एका धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक रमीझ राजा (Ramiz Raja) आणि ऑस्ट्रेलियाच्या माजी महिला खेळाडू लिसा स्थळेकर (Lisa Sthalekar) यांच्याशी संबंधित हा वाद आहे. Ramiz Raja Kissing
काय आहे संपूर्ण घटना? (Ramiz Raja Kissing)
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, पीएसएलचा (PSL) एक सामना सुरू असताना कॉमेंट्री बॉक्समध्ये रमीझ राजा आणि लिसा स्थळेकर एकत्र समालोचन (कॉमेंट्री) करत होते. यादरम्यान, लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू असतानाच रमीझ राजा यांनी लिसा यांना मिठी मारत किस केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल केले जात असून, चाहत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Ramiz Raja Kissing)
🔴 ANOTHER EMBARRASSING MOMENT FOR PAKISTAN 🔴
Ex Pakistani Cricketer Ramiz Raja seen in an inappropriate act with a girl in the commentary box during a PSL match😳😳 pic.twitter.com/OWkQC7UHzB
— Amit (@RohitianAP) May 1, 2026
या घटनेपूर्वी आणखी एक चूक घडली होती. समालोचन करताना रमीझ राजा यांच्याकडून चुकून पीएसएल (PSL) ऐवजी आयपीएल (IPL) असा उल्लेख झाला होता. जरी त्यांनी लगेचच आपली चूक सुधारली असली, तरी लाईव्ह व्हिडिओमुळे तो भागही लोकांच्या निदर्शनास आला. यापूर्वीही पीएसएलमध्ये नाणेफेकीपूर्वी बंदुकीच्या मारामारीचे व्हिडिओ चर्चेत आले होते, त्यामुळे या लीगवरील वादांची मालिका सुरूच आहे.
VIDEO: Ramiz Raja craze is on next level in PSL😂 pic.twitter.com/MNnPw3CRA3
— Ankit Kunwar (@TheAnkitKunwar) April 30, 2026
कोण आहे लिसा स्थळेकर?
Ramiz Raza really went from commentary to romance mid match in PSL 😭😭 pic.twitter.com/1NiAcDTuGN
— Noah (@Noahasthetic) April 30, 2026
लिसा स्थळेकर ही ऑस्ट्रेलियाची माजी अष्टपैलू (All-rounder) महिला क्रिकेटपटू आहे. सध्या ती क्रिकेट विश्वात समालोचक म्हणून काम करत आहे. तिने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी ८ कसोटी सामने, १२५ एकदिवसीय (ODI) आणि ५४ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीत ४१६ धावा आणि २३ विकेट्स, एकदिवसीय सामन्यांत २,७२८ धावा व १४६ विकेट्स, तर टी-२० मध्ये ७६९ धावा व ६० विकेट्स अशी तिची उत्कृष्ट आकडेवारी आहे. (Ramiz Raja Kissing)





