IPL Cheerleaders Safety : IPL मध्ये चिअर लीडर्स असुरक्षित? लखनौच्या स्टेडियममध्ये असं काही घडलं? ज्यामुळे बसवाव्या लागल्या सेफ्टी नेट
IPL Cheerleaders Safety : लखनौ स्टेडियम प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून चिअर लीडर्सच्या डान्सिंग स्टेजभोवती सेफ्टी नेट उभारली आहे.

IPL Cheerleaders Safety : सध्या भारतात आयपीएल २०२६ (IPL2026) ची रणधुमाळी सुरू असून, चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहत चाहते खूश आहेत. मात्र, मैदानावर होणाऱ्या या मनोरंजनादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लखनौच्या एकाना स्टेडियममधील (Ekana Stadium) चिअर लीडर्सच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून, स्टेडियम प्रशासनाने त्यांच्याभोवती सेफ्टी नेट (सुरक्षा जाळी) लावण्याचा निर्णय घेतला आहे.
चिअर लीडर्सवर पैशांची उधळण – (IPL Cheerleaders Safety)
सामन्यादरम्यान चौकार, षटकार आणि विकेट्स पडल्यानंतर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी चिअर लीडर्स डान्स करत असतात. मात्र, अलीकडेच सोशल मीडियावर काही व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये काही प्रेक्षकांनी चिअर लीडर्सवर पैसे उधळल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या नोटांवर प्रेक्षकांनी आपले मोबाईल नंबर लिहून ते चिअर लीडर्सच्या दिशेने फेकले होते.
Fans throwing sunglasses toward cheerleaders in Lucknow 😭
Lucknow fans having fun with cheerleaders while throwing sunglasses toward them, and the cheerleaders looked happy after receiving the sunglasses. pic.twitter.com/x7Od9EZ9cH
— Sonu (@Cricket_live247) April 23, 2026
स्टेडियम प्रशासनाने घेतली खबरदारी – ( IPL Cheerleaders Safety)
View this post on Instagram
या अयोग्य प्रकारानंतर चिअर लीडर्सच्या सुरक्षेबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी अशा प्रकारांचा निषेध केला आहे. काहींनी तर आयपीएलमध्ये चिअर लीडर्सची गरजच काय, असाही प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत स्टेडियम प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून चिअर लीडर्सच्या डान्सिंग स्टेजभोवती सेफ्टी नेट उभारली आहे. ( IPL Cheerleaders Safety)
Look at the way GT cheerleaders reacted when CSK fans started disturbing them—asking for selfies and trying to talk repeatedly. It was fine at first, but as more fans gathered, it became overwhelming. 👀
Eventually, they moved away and resumed their dance. pic.twitter.com/f0Mx2PeWWq
— Sonu (@Cricket_live247) April 28, 2026
लखनौ सुपर जायंट्सची खराब कामगिरी –
एकीकडे मैदानाबाहेरील या घडामोडींची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाची आयपीएलमधील कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाला यंदाच्या मोसमात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. लखनौने आतापर्यंत ८ सामने खेळले असून, त्यापैकी केवळ २ सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला आहे, तर ६ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या ४ गुणांसह लखनौचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. त्यांचा नेट रनरेटही -१.१०६ असा अत्यंत खराब आहे. अशा परिस्थितीत जर संघाने आगामी १-२ सामने गमावले, तर त्यांचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात येईल. (IPL Cheerleaders Safety)





