Ram Mandir : भक्तांकडून रामलल्लावर पैशांचा वर्षाव; चार दिवसातच रामलल्ला झाले करोडपती….

Ram Mandir – रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य महालात स्थायिक झाले आहे. राम मंदिरात सोमवारी (दि. 22 जानेवारी) झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने रामभक्तांची 500 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. अवधपुरीमध्ये अभिमानाने उभे असलेले राम मंदिर ही केवळ एक इमारत नाही,
तर 500 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर साकार झालेले चैतन्य, समर्पण, त्याग आणि तपश्चर्याचे परिणाम आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवार पासून रामलल्लाचे दर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.
भव्य राम मंदिराच्या उभारणीत सर्वसामान्यांपासून ते खास व्यक्तींनी देणगी दिली आहे. काहींनी कोट्यवधी तर काहींनी लाखांची देणगी देऊन मंदिर उभारणीत हातभार लावला.
अशात रामभक्तांनी रामलल्लावर पैशांचा किती वर्षाव केलाय याची देखील आकडेवारी समोर आली आहे. राम मंदिरासाठी फक्त देशातूनच नव्हे तर परदेशातूनही देणग्या येत आहेत. आतापर्यंत कोट्यवधींचं दान जमा झाले आहे.
त्यामुळे चार दिवसातच रामलल्ला चरणी किती दान झाले यावर एक नजर टाकूया. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी राम मंदिरात 2 कोटी 90 लाखाचे दान आले.
त्यानंतर 24 जानेवारीला 2 कोटी 43 लाख रुपये, 25 जानेवारीला 8 लाख 50 हजार रुपये आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी 1 कोटी 15 लाख रुपयांची देणगी आली आहे.
त्यानंतर 27 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 75 हजार राम भक्तांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. रामलल्लावर भक्त पैशांचा वर्षाव करत असून, पुढे ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





