Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील राम लल्ला मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

उत्तर प्रदेश – पौराणिक मान्यतांनुसार, भगवान रामाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला झाला होता, जो हिंदू लोक ‘रामनवमी’ म्हणून साजरा करतात.
यंदा हा दिवस 10 एप्रिल रोजी आहे. आणि याच दिवसाचे औचित्य साधून आज उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील राम लल्ला मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.
Uttar Pradesh | A large number of devotees arrive at Ram Lalla temple in Ayodhya to offer prayers on the occasion of #RamNavami pic.twitter.com/GoGC4ZIPQQ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 10, 2022
आज सकाळ पासूनच भाविकांनी मंदिरात भगवान श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. रामनवमीच्या दिवशी भगवान राम आणि माता सीता यांची घरोघरी आणि मंदिरांमध्ये पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. आज अयोध्येत सर्वत्र आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे.




