Ram Gopal Verma : बहुचर्चित धुरंधर २ हा चित्रपट १९ मार्च या दिवशी देशभरातील चित्रपटागृहात प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच १८ मार्च या दिवशी चित्रपटाचे पेड प्रिव्ह्यू शो अनेक ठिकाणी दाखविण्यात आले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘धुरंधर २’ पाहिला असून आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. या चित्रपटाची भव्यता ‘शोले’ पेक्षाही १०० पटीने अधिक असेल. इतकेच नव्हे तर, ‘मुघल-ए-आझम’पासून आजवर निर्माण झालेले सर्व महान चित्रपट यापुढे केवळ ‘टीव्ही मालिकां’सारखे भासतील, हे निश्चित आहे, असे ते म्हणाले आहेत. या प्रतिक्रियेवर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. After last nights watch of #Dhurandhar2 in terms of it’s sheer cumulative impact in every which way , whether on it’s expected collections , audience euphoria , social influences , cinematic grammar breaking , and above all the psychological audio visual impact , it will be a… — Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 18, 2026 नेमकं काय म्हणाले राम गोपाल वर्मा? काल रात्री धुरंधर २ पाहिल्यानंतर त्याच्या सर्वच अंगांनी निर्माण होणाऱ्या प्रचंड आणि एकत्रित प्रभावाचा विचार करता मग ते त्याचे अपेक्षित बॉक्स ऑफिस कलेक्शन असो, प्रेक्षकांचा उत्साह असो, सामाजिक प्रभाव असो, चित्रपटाच्या पारंपरिक व्याकरणाला दिलेले नवे वळण असो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा मनावर होणारा दृकश्राव्य परिणाम असो. या चित्रपटाची भव्यता ‘शोले’ पेक्षाही १०० पटीने अधिक असेल. इतकेच नव्हे तर, ‘मुघल-ए-आझम’पासून आजवर निर्माण झालेले सर्व महान चित्रपट यापुढे केवळ ‘टीव्ही मालिकां’सारखे भासतील, हे निश्चित आहे. हेही वाचा : Warm Water: “गरम पाणी पिऊन पोट कमी होते का? तज्ज्ञांनी सांगितलं खरं सत्य!” पुढे राम गोपाल वर्मा म्हणतात, हा म्हणजे एका ‘नव्या चित्रपट युगाचा’ जन्मच होय; आणि यापूर्वीच्या चित्रपट विश्वात जे काही अस्तित्वात होते, त्या सर्वांचा हा एक निर्दय आणि संपूर्ण अस्तच आहे. ‘दिग्दर्शक’ या शब्दाची सुरुवातच आता आदित्य धर यांच्या नावाने होईल आणि खुद्द स्टीव्हन स्पीलबर्गव ख्रिस्तोफर नोलन यांच्यासारख्या दिग्गजांनीही सध्या हाती असलेली सर्व कामे बाजूला सारून धुरंधर २ चा ‘पहिला दिवस, पहिला शो’ पाहणेच अधिक शहाणपणाचे आणि हिताचे ठरेल, अशी प्रतिक्रिया राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून दिली आहे. धुरंधर चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ असल्याने धुरंधर २ लाही प्रेक्षक उदंड प्रतिसाद देतील. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. चित्रपट रिलीज होण्याअगोदर पेड प्रीव्ह्यू शोसाठी ८ लाख तिकीटांची विक्री झाली असून, ३६ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो. तर अॅडव्हान्स बुकिंगचा आकडा आश्चर्यचकित करणारा आहे. ओपनिंक वीकेंड मध्ये १३० कोटी रुपहून अधिकची कमाई चित्रपटाने केली आहे. पहिल्या भागापेक्षा १५ मिनिटे अधिक धुरंधर चित्रपटाची लांबी ३ तास ३४ मिनिटे इतकी होती. तर धुरंधर २ ची लांबी १५ मिनिटे अधिक असून, ती तब्बल ३ तास ४९ मिनिटांची आहे. थोडा विचार करता ११ मिनिटे कमी चार तासाचा धुरंधर २ चित्रपट आहे. हेही वाचा : Ali Larijani Death: कोण होते अली लारीजानी? ; ज्यांच्या जाण्याने इराणला बसला मोठा धक्का , जाणून घ्या