Rajinikanth : धुरंधर 2 ने देशातच नव्हे तर जगभरात आपला जलवा दाखवत बॅाक्स अॅाफिसवर धडाकेबाज कामगिरी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या धुरंधर 2 ने बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांसोबतच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना या चित्रपटाने भुरळ पाडली आहे. अल्लू अर्जुन, महेश बाबू , अक्षय कुमार, विजय देवराकोंडा यांसारख्या अनेक कलाकारांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. आता या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टीचे थलावया सुपरस्टार रजनीकांत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. हा चित्रपट ‘मस्ट वॉच’ असे म्हणत त्यांनी प्रत्येक भारतीयानं हा चित्रपट पाहावा अशी शिफारसही केली आहे. “काय जबरदस्त फिल्म आहे… #Dhurandhar2!!! आदित्य धर बॉक्स ऑफिसचा बाप!!! रणवीर आणि पूरी कास्ट आणि क्रू ला खूप खूप शुभेच्छा… प्रत्येक भारतीयाने नक्कीच पाहण्यासारखा सिनेमा… जय हिंद…” असे ट्वीट रजनीकांत यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन केले आहे. हेही वाचा : Eknath Shinde : रात्री उशिरा मोठी घडामोड..! शिंदेंनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकी काय चर्चा झाली? रजनीकांत यांच्या ट्वीटनंतर आता चित्रपटाबद्दलची चर्चा आणि उत्सुकता पुन्हा एकदा शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे. या ट्वीटवर दिग्दर्शक आदित्य धर याने आभार मानले आहेत. “सर, आम्ही सर्वजण मनोरंजनाचं मोजमाप केवळ एकाच निकषावर करत मोठे झालो आहोत. असे म्हणत सर, मी तुमचा किती ऋणी आहे, हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या गोष्टीनं माझ्या हृदयाला खरोखरंच स्पर्श केलाय, असे आदित्य धर म्हणाला आहे. What a film … #Dhurandhar2 !!! Aditya Dhar 🫡 box office -ka baap !!! Many congratulations to Ranveer and the entire cast and crew. A must watch film for every indian. Jai hind 🇮🇳 @AdityaDharFilms @RanveerOfficial — Rajinikanth (@rajinikanth) March 23, 2026 धुरंधर 2 चा बॅाक्स अॅाफिसवर जलवा धुरंधर 2 द रिवेंज चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॅाक्स अॅाफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॅार्ड मोडीत काढत 100 कोटींचा यशस्वी टप्पा पार ओलांडला आहे. आता त्याची कमाई आश्चर्यचकित करणारी आहे. गुढीपाडवा सणाच्या दिवशी रिलीज झालेल्या या चित्रपटाने जगभरात एकूण 751.97 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे, ज्यामध्ये 541.97 कोटी भारतातून आणि 210 कोटींची कमाई विदेशातून केली आहे. चित्रपटाचे भारतातील नेट कलेक्शन तब्बल 457.12 कोटींच्या घरात गेले आहे. हेही वाचा : Aruna Irani: ‘इंडियन आयडल १६’मध्ये अरुणा ईराणींचा जबरदस्त डान्स; विशाल ददलानी-श्रेय घोषालही झाले फिदा