Ram Gopal Verma : सरकार 4 बाबत मोठी अपडेट! अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची जोडी पुन्हा झळकणार
Ram Gopal Verma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सरकार 4 ची घोषणा केल्यानंतर आमिताभ आणि अभिषेक दोघेही दिसणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर इतर कलाकारांबाबत माहिती उघड केलेली नाही.

Ram Gopal Verma : हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सरकार 4 चित्रपटाची घोषणा केली आहे. पुढच्या महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. अशातच या चित्रपटातील स्टारकास्टबाबत एक महत्वाचा खुलासा त्यांनी केला आहे.
एका मुलाखतीत, राम गोपाल वर्मा यांनी सरकार 4 ची पटकथा पूर्ण झाली आहे. मी या वर्षाच्या मध्यात या चित्रपटाचे चित्रीकरण करेन, असे म्हटले होते. चित्रपटातील कास्टबाबत विचारलेल्या प्रश्नावर राम गोपाल वर्मा यांनी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन दोघेही या चित्रपटाचा भाग असतील, असे जाहीर केले आहे. तर उर्वरित कलाकारांनाबद्दल त्यांनी माहिती उघड केली नाही.
राम गोपाल वर्मा पुढे म्हणाले की, त्यांना हा चित्रपट एका वर्षाच्या आत पूर्ण करायचा आहे. त्यानंतर त्यांना “सिंडिकेट” या चित्रपटावर काम करायचे आहे, ज्याची त्यांनी याआधीच घोषणा केली होती.
राम गोपाल वर्मा हे दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय झाले ते सत्या चित्रपटामुळे. 90 च्या दशकात रिलीज झालेल्या या चित्रपटाने मोठा इतिहास रचला. त्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी अनेक चित्रपट केले. पण त्यांचे काही चित्रपट फ्लॅापही ठरले. फेम मिळाल्यानंतर राम गोपाल वर्मा यांचा चित्रपट रिलीज झाले की फ्लॅाप ठरणार अशी समजूत तयारी झाली होती.
मात्र, 2005 मध्ये सरकार या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा राम गोपाल वर्मा यांनी जोरदार कमबॅक केले. त्यानंतर सरकारचे सिक्वल सरकार-राज आणि सरकार 3 हे हिट ठरले. अमिताभ बच्चन यांनी सुभाष नागरेची शक्तिशाली भूमिका साकारली होती. तर अभिषेक बच्चन याने अमिताभ यांचा मुलगा शंकरची भूमिका साकारली होती.
सरकार फ्रँचायझीमधील दुसरा चित्रपट “सरकार राज” 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर 2017 मध्ये “सरकार ३” प्रदर्शित झाला. अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत यामी गौतम, मनोज बाजपेयी आणि अमित साध हे कलाकार होते. आता “सरकार 4” च्या घोषणेमुळे चाहते उत्सुक आहेत.
हेही वाचा : Pak-Afghan War: कंदहारमधील तालिबान तळावर हवाई हल्ले ; पाकिस्तानने घेतला ड्रोन हल्ल्यांचा बदला




