जेएनयूमधील हिंसेविरोधात फर्ग्युसनमध्ये रॅली

पुणे: जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये सामान्य विद्यार्थी व अभाविप कार्यकर्ते यांच्यावर करण्यात आलेल्या हिंसे विरोधात व अभाविपच्या समर्थनार्थ पुण्यातील फर्गुसन महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकडून रॅली काढण्यात आली.
डाव्या संघटनामुळे महाविद्यालयामध्ये चालू असलेले डेज बंद करण्यात आले. डाव्या संघटनांकडून वारंवार होणाऱ्या आंदोलनांमुळे शेक्षणिक नुकसान होत आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या आधारावर ह्या रॅलीचे आयोजन करणयात आले होते. दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये हिंसा करणाऱ्या डाव्या संघटनांची नावे जाहीर केली आहेत.
ही डाव्या संघटनांनी ठरवून केलीली हिंसा आहे तसेच आम्ही सर्व विद्यार्थी अभाविपसोबत आहोत असे मत विद्यार्थ्यांनी रॅली दरम्यान मांडले.अभाविप कायमच आमच्या समस्या सोडवत आली आहे व संविधानिक मार्गाने आपली भूमिका मांडणारी संघटना आहे. असे मत देखील या वेळेस विद्यार्थांनी मांडले.





