Nagar | तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत राळेगणसिद्धीचे वर्चस्व

पारनेर, (प्रतिनिधी) – तालुक्यातील राळेगणसिद्धी विद्यालय व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय मुलांच्या कबड्डी स्पर्धा नुकत्याच राळेगणसिद्धी येथे पार पडल्या. या स्पर्धेत राळेगणसिद्धी विद्यालयाच्या दोन संघांनी विजेतेपद पटकावून आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
राळेगणसिद्धीच्या श्री संत निळोबाराय विद्यालयाने परंपरेला साजेसा खेळ करीत १४ वर्ष व १७ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला.
१४ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक पारनेरच्या न्यू इंग्लिश स्कूलने पटकावला तर १७ वर्षे वयोगटात निघोजच्या मुलिकादेवी विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला. १९ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक टाकळीच्या ढोकेश्वर विद्यालयाने पटकाविला तर द्वितीय क्रमांक अळकुटीच्या साईनाथ हायस्कूलने मिळवला.
या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन श्री संत यादवबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदाशिव मापारी यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे संचालक निवृत्ती मापारी, यादवराव गायकवाड, नानाभाऊ औटी, रामभाऊ उगले, मा. सरपंच लाभेश औटी, प्राचार्य सोपानराव घाणे, तालुका क्रीडाशिक्षक संघाचे अध्यक्ष बापू होळकर, पर्यवेक्षक रमेश गारूडकर उपस्थित होते.
या स्रर्धेत तालुका उपाध्यक्ष दत्ता मांडगे, गंगाराम खोडदे, बाबाजी साळुंके, अक्षय शिंदे, ज्ञानेश्वर मापारी, ऋषिकेश औटी, सचिन मापारी, योगेश गाजरे यांनी पंच म्हणून काम केले. स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील तरुण व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.





