Rajyasabha Election : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने राजस्थानमधील राज्यसभा निवडणुकीसाठी चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठौर यांना उमेदवारी घोषित केली आहे.
मदन राठोड दोन वेळा सुमेरपूरचे आमदार आणि राजस्थान विधानसभेचे उपमुख्य व्हीप होत. तर, भाजपचे ज्येष्ठ नेते चुन्नीलाल गरसिया यांच्याकडे सध्या भाजपचे राजस्थान प्रदेश उपाध्यक्षपद आहे. राजस्थान विधानसभेत राज्यसभेच्या तीन जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. | Rajyasabha Election
राजस्थानमधील दोन राज्यसभा सदस्य- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (काँग्रेस) आणि भूपेंद्र यादव (भाजप)- यांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपत असल्याने ही निवडणूक होत आहे.
डिसेंबरमध्ये भाजपचे खासदार किरोडी लाल मीना यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर संसदेचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या एका जागेवरही निवडणूक होणार आहे.आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आत्तापर्यंत एकूण १४ उमेदवारांची घोषणा केली आहे. | Rajyasabha Election
सध्याचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंग यांना उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अमरपाल मौर्य, साधना सिंग, चौधरी तेजवीर सिंग, संगिता बलवंत आणि नवीन जैन यांनाही या राज्यातून उमेदवारी देण्यात आली आहे.
बिहारमधून धर्मशीला गुप्ता आणि भीम सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर सुभाष बराला आणि नारायणा कृष्णसा भंडागे यांना अनुक्रमे हरियाणा आणि कर्नाटकमधून उमेदवारी देण्यात आली आहे.