CJP Protest : मोठी बातमी..! पुण्यात ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनात गोंधळ; घोषणाबाजी, माध्यम प्रतिनिधींशी वाद
CJP Protest : दिल्लीतील आंदोलनानंतर, पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनादरम्यान आज मोठा गोंधळ उडाला.

CJP Protest : दिल्लीतील आंदोलनानंतर आता पुण्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP)च्या आंदोलनाची चर्चा रंगली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन पार पडले. मात्र आंदोलनादरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. (CJP Protest)
अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला विद्यापीठ प्रशासनाने काही अटी आणि शर्तींसह परवानगी दिली होती. NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलक रस्त्यावर उतरले होते. (CJP Protest)
आंदोलनात मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “नरेंद्र मोदी उत्तर द्या”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. (CJP Protest)
दरम्यान, आंदोलनादरम्यान काही तरुण आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाल्याची घटना घडली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही काही आंदोलकांनी केला. (CJP Protest)
घटनेची माहिती मिळताच सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होते. आंदोलन शांततेत पार पडावे, यासाठी आयोजकांकडूनही आवाहन करण्यात आले. (CJP Protest)
NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना पुण्यातील या आंदोलनानेही विद्यार्थ्यांच्या नाराजीला मोठी अभिव्यक्ती मिळाल्याचे पाहायला मिळाले. (CJP Protest)





