पुणे जिल्हा | स्वराज्य पक्षाच्या मुळशी तालुका अध्यक्षपदी राजू फाले

पौड,(वार्ताहर) – पुणे जिल्ह्याच्या स्वराज्य संघटनेच्या निमंत्रकपदी यापूर्वी राजू फाले यांनी काम केले आहे. यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना जिल्हा कमिटीत काम करण्याचा छत्रपती संभाजी महाराज यांनी आग्रह केला होता; परंतु मुळशी तालुक्याच्या विकासाकरिता व गोरगरिबांच्या कामे करण्यासाठी फाले यांनी मुळशी तालुका अध्यक्षपदी काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यांना त्याचे नियुक्तीपत्र संभाजी महाराजांनी स्वराज्य पक्षाच्या प्रथम तालुका अध्यक्ष म्हणून मुळशीतील नांदगाव चे सुपुत्र राजू फाले यांना मिळाला आहे.
फाले यांनी मुळशी तालुक्यात महसूल विभाग मार्फत 7/12चूक दुरुस्ती अभियान राबविणे, रुग्णांना आरोग्य सेवेतील खाजगी दवाखान्यातील बिल विविध शासकीय योजनेत बसवून बिल कमी करून देणे,
पंचायत समिती मुळशीला गट विकास अधिकारी मिळावा याकरिता आंदोलन, सारथी करिता आंदोलन, रस्ता, लाईट, पाणी या गरजा मिळाव्यात याकरता वेळोवेळी नागरिकांना मदत केली असल्याने याच कामाची पावती म्हणून त्यांना स्वराज पक्षाच्या मुळशी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुढील काळात आम्ही स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून शेतकरी, गोरगरीब लोकांचा पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे फाले यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.





