शिवस्मारकास युवराज छत्रपती संभाजी महाराज व मनोज जरांगे यांचे अभिवादन

पौड : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडच्या दिशेने मार्गस्थ झालेले युवराज छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी पौड (ता. मुळशी) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला भेट देत पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
ताम्हिणी-कोलाड महामार्गावरून रायगडाकडे जात असताना समर्थकांच्या आग्रहास्तव दोघांनी पौड येथे थांबून स्मारकाला भेट दिली. प्रथम छत्रपती संभाजी महाराज स्मारकस्थळी दाखल झाले, त्यानंतर मनोज जरांगे यांनीही पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
या प्रसंगी स्वराज्य पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजू फाले, युवक अध्यक्ष ऋषिकेश जाधव, आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख प्रमोद बलकवडे, माजी संचालक राम गायकवाड यांच्यासह आकाश शेडगे, नामदेव वाघ, प्रतीक साखरे, हर्षल जोरी, समीर दुडे, अक्षय बुचडे, आबा साखरे, दत्ता धिडे, ओंकार उबाळे, चंदू हुलावळे, विठ्ठल पवार, नवनाथ साठे यांच्यासह अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीने पौड परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवराज्याभिषेक दिनाचा उत्सव अधिक दिमाखदार झाला.





