“औरंग्याची निशाणी महाराष्ट्रामध्ये कशाला पाहिजे?”; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांनी औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचा इशारा दिला तसेच बाबरीची पुनरावृत्ती होईल असा गंभीर इशारा त्यांनी दिला होता.
यापार्श्वभूमीवर सरकारने औरंगजेबच्या कबरीवर सुरक्षा वाढवली आहे. त्या ठिकाणी आता एसआरपीएफची तुकडी तैनात केली आहे. त्यात 15 पोलीस कर्मचारी असणार आहे. तसेच दोन पोलीस अधिकारी कबरीचे संरक्षण करणार आहे. यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे ही भावना शिवभक्तांची असून तीच माझी भावना असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “शिवभक्तांच्या भावनांचा आदर मी करतो, औरंगजेबान संभाजी महाराजांचा छळ केला. संभाजी महाराज यांचे शौर्य आणि औरंगजेबाचे क्रौर्य, त्या क्रौर्याची परिसीमा त्याने गाठली होती. त्यामुळे अशा औरंग्याची निशाणी किंवा आठवणी या महाराष्ट्रामध्ये कशाला पाहिजे? ही भावना शिवभक्तांची आहे, तीच माझी भावना आहे. ”
“क्रूरकर्मा औरंग्याचे कोणीही समर्थन करता कामा नये. तो महाराष्ट्राचा दुश्मन होता, देशद्रोही, राष्ट्रद्रोही होता, अशा या औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे. जे उदात्तीकरण करतात त्यांचा निषेध केला पाहिजे,” अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. Eknath Shinde |
हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पलटवार
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगजेबाची उपमा दिली होती. त्यावरून कोणाची तुलना करत आहात तुम्ही जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पटलवार केला. काँग्रेसने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचावा, छावा सिनेमा पाहावा आणि नंतर उदात्तीकरणाचा विचार करावा, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले. Eknath Shinde |
हेही वाचा:
Supriya Sule : सहा महिन्यात आणखी एकाची विकेट जाणार; सुप्रिया सुळेंच्या विधानाने खळबळ





