Rajgurunagar News : राजगुरुनगरात गणरायाचे दिमाखात आगमन; ढोल-ताशांच्या गजराने शहर दुमदुमले
राजगुरुनगर शहरात गणरायाच्या (Rajgurunagar News) आगमनाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, मानाच्या गणपतींचे ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या उधळणीत दिमाखात स्वागत करण्यात आले.

Rajgurunagar News : राजगुरुनगर शहरात गणरायाच्या (Rajgurunagar News) आगमनाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, मानाच्या गणपतींचे ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या उधळणीत दिमाखात स्वागत करण्यात आले. विविध गणेश मंडळांच्या मिरवणुकांमुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. पारंपरिक वाद्यांचा गजर, गणेशभक्तांचा उत्साह आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
मानाच्या मोती चौक गणपतीची दुपारी हुतात्मा राजगुरू स्मृती शिल्पापासून भव्य मिरवणूक (Rajgurunagar News) काढण्यात आली. पालखीत विराजमान केलेल्या गणरायाची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीदरम्यान भाविकांनी फुलांची उधळण करत गणरायाचे उत्साहात स्वागत केले. ढोल-ताशांचा दणदणाट आणि गणरायाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.
मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झाले होते. विविध गणेश मंडळांच्या मिरवणुकांमध्ये उत्साहाची चढाओढ पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, आधुनिकतेपेक्षा पारंपरिक संस्कृतीला प्राधान्य देत ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मोती चौक गणपतीच्या मिरवणुकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
गणरायाच्या आगमनाचा (Rajgurunagar News) हा सोहळा केवळ उत्सव न राहता भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारा ठरला. शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत गणरायाचे स्वागत केले.






