Pune District : संघटन बळकट करण्याचा निर्धार; खेड ग्रामीण मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी अॅड. कावेरी राळे
Pune District : भाजप खेड ग्रामीण मंडल प्रभारी चंद्रशेखर बाळासाहेब शेटे, मंडल अध्यक्ष अमित शेटे आणि विधानसभा प्रभारी प्रियाताई नारायण पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

राजगुरुनगर : भारतीय जनता पक्षाच्या खेड ग्रामीण मंडल महिला मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक वाडा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत ड. कावेरी राळे यांची खेड ग्रामीण मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नव्या नेतृत्वामुळे महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात गावागावातील महिला शक्ती संघटित करून पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
भाजप खेड ग्रामीण मंडल प्रभारी चंद्रशेखर बाळासाहेब शेटे, मंडल अध्यक्ष अमित शेटे आणि विधानसभा प्रभारी प्रियाताई नारायण पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महिला मोर्चाच्या माध्यमातून महिलांना संघटित करून त्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, त्यांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रोत्साहन देणे, सामाजिक परिवर्तनामध्ये त्यांचा सहभाग वाढविणे तसेच राष्ट्रनिर्मितीमध्ये महिलांची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा उत्तर पुणे जिल्हा महिला मोर्चा प्रभारी संजीवनी पांडे, उत्तर पुणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सायली बोत्रे, उत्तर पुणे जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस रत्ना पिंगळे, सुमित्रा जाधव, कोषाध्यक्ष कल्याणी ठाकर, सचिव मृदुला भावे, आशा रोहिदास शेटे, दीपाली खानविलकर, वैजू कहाणे, अंजली बोर्हाडे, सुवर्णा शेलार, ज्योती कदम, अरुणा कदम, सविता शिंदे, बेबी चिंचकर, अर्चना जाधव, विद्या शिंदे, राणी शिंदे यांच्यासह परिसरातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





