Pune Ganeshotsav 2026 : ढोल-ताशांचा गजर अन् बाप्पाचा जयघोष; मानाचा पहिला कसबा गणपतीच्या आगमन मिरवणुकीत दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी
Ganeshotsav 2026 : १९ वर्षीय वेदमूर्ती देवव्रत रेखे यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना

Ganeshotsav 2026 : पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असलेल्या श्री कसबा गणपती बाप्पांच्या आगमनाचा मंगल सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. ढोल-ताशांचा गजर, वेदमंत्रांचा निनाद आणि बाप्पांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे. बाप्पांना पालखीत विराजमान करून आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
मिरवणुकीत प्रभात बँड, संघर्ष ढोल-ताशा पथक, ज्ञानप्रबोधिनी युवक विभाग आणि शौर्य ढोल-ताशा पथक सहभागी झाले आहेत. रास्ता पेठ पॉवर हाऊस, केईएम रुग्णालय, अपोलो थिएटर, दारूवाला पूल आणि देवजीबाबा चौकमार्गे ही मिरवणूक कसबा गणपती मंदिराजवळ पोहोचणार आहे. Ganeshotsav 2026
त्यानंतर सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी श्रींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. वाराणसी येथील सांगवेद विद्यापीठातील कठीण मानले जाणारे दंडक्रम पारायण यशस्वीरीत्या पूर्ण केलेले १९ वर्षीय वेदमूर्ती देवव्रत रेखे यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. Ganeshotsav 2026
हेही वाचा:





