Rajgurunagar Case : ‘राजगुरुनगर’ अत्याचार प्रकरण ; आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी

पुणेः २५ डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे सख्या बहिणींची अत्यंत निर्घणपूणे हत्या करण्यात आली होती. तसेच यापैकी एका चिरमुडीवर नराधमाने लैंगिक अत्याचार केले होते. या घटनेने राजगुरुनगरसह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी २४ तासांच्या आतमध्ये अटक केली होती. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर वेटर कामगार असलेल्या आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीत आरोपीची रवानगी करण्याचे आदेश खेड सत्र न्यायालयाने दिले आहेत.
आरोपीच्या लैंगिक सक्षमतेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याचे डीएनए नमुने प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेला पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. तसेच घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असल्याचे देखील पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणात आरोपी असलेल्या ५४ वर्षीय वेटरला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश खेड सत्र न्यायालयाने दिले आहेत.
आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी
२५ डिसेंबरच्या दिवशी अंगाणात खेळणाऱ्या दोन चिमुरडींना खाऊचे आमिष दाखवून आरोपीने त्यांना खोलीत नेले. तिथे सख्या बहिणींपैकी एका चिरमुडीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दोन्ही बहिणींना पाण्याने भरलेला टाकीत बुडवून मारले. या प्रकरणानंतर राजगुरूनगरसह जिल्ह्यातून तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागमी केली जात आहे.





