Gurmeet Ram Rahim : गुरमीत राम रहीमला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर; सहा वर्षात 16 वेळा आला तुरुंगाबाहेर
बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेला ५७ वर्षीय डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग मंगळवारी सकाळी रोहतक येथील सुनारिया तुरुंगातून बाहेर पडला.

Gurmeet Ram Rahim – बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेला ५७ वर्षीय डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग मंगळवारी सकाळी रोहतक येथील सुनारिया तुरुंगातून बाहेर पडला. त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता.
२०१७ मध्ये शिक्षा झाल्यापासून तुरुंगातून सुटका होण्याची ही त्याची १६ वी वेळ आहे. जानेवारीमध्ये त्याला अशाच प्रकारचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता, त्यानंतर काही महिन्यांनीच त्याची पुन्हा सुटका झाली आहे.
मार्च महिन्यात, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राम रहीम सिंग याची २००२ मधील एका पत्रकाराच्या हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात एका विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर, सात वर्षांनी हा निर्णय देण्यात आला.
मे २०२४ मध्ये, उच्च न्यायालयाने आणखी एका विशेष सीबीआय न्यायालयाचा आदेश रद्द केला आणि पंथाचे (डेराचे) माजी व्यवस्थापक रणजित सिंग यांच्या २००२ मधील हत्या प्रकरणात राम रहीम आणि इतर चार जणांची निर्दोष मुक्तता केली. (Gurmeet Ram Rahim)
सिरसा येथे मुख्यालय असलेल्या डेरा सच्चा सौदा पंथाचे हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. डेराचे प्रवक्ते आणि वकील जितेंद्र खुराणा यांनी सांगितले की, पॅरोलच्या कालावधीत डेरा प्रमुख सिरसा येथील आपल्या मुख्यालयातच वास्तव्य करतील.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीसह विविध शीख संघटनांनी यापूर्वी राम रहीम याला वारंवार पॅरोल आणि फर्लो मंजूर करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.
असा आहे इतिहास पॅरोलचा (Gurmeet Ram Rahim)

Gurmeet Ram Rahim : गुरमीत राम रहीमला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर; सहा वर्षात 16 वेळा आला तुरुंगाबाहेर
ऑगस्ट २०२५ मध्ये गुरमीत राम रहीम ४० दिवसांच्या पॅरोलवर, एप्रिल २०२५ मध्ये २१ दिवसांच्या फर्लोवर आणि ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या आधी, जानेवारी २०२५ मध्ये ३० दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता.
तसेच, ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या काही दिवस आधी, १ ऑक्टोबर २०२४ रोजी त्याला २० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता.
याशिवाय ऑगस्ट २०२४ मध्ये २१ दिवसांचा फर्लो आणि पंजाब विधानसभा निवडणुकांच्या अवघ्या दोन आठवडे आधी, फेब्रुवारी २०२२ मध्ये तीन आठवड्यांचा फर्लोही त्याला देण्यात आला होता.





