Yash Dayal : राजस्थान उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! यश दयालच्या अटकेला स्थगिती नाही

ब्लॅकमेलचा डाव – यशच्या वकिलांचा युक्तिवाद
यश दयालचे वकील कुणाल जैमन यांनी युक्तिवाद करताना हा संपूर्ण प्रकार क्रिकेटरला बदनाम करण्याचा डाव असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, याचप्रमाणे गाझियाबाद येथेही बलात्काराचा खटला दाखल झाला होता, ज्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. “त्या घटनेनंतर अवघ्या सात दिवसांनी जयपूर येथे आणखी एक FIR दाखल झाली. यामागे ब्लॅकमेल करणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसते,” असे जैमन यांनी आरोप केला.
जयपूरच्या हॉटेलमध्ये बलात्कार – पोलिसांचा दावा
जयपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी, जी घटनेच्या वेळी अल्पवयीन होती, ती एका क्रिकेट कार्यक्रमादरम्यान यश दयालच्या संपर्कात आली होती. तिने दयालवर दोन वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये करिअरसाठी मदत करण्याच्या बहाण्याने यौन शोषण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आयपीएल 2025 हंगामादरम्यान जयपूरच्या सीतापूरा येथील एका हॉटेलमध्ये यश दयालने त्या मुलीला खोलीत बोलावून पुन्हा बलात्कार केला. त्या वेळी पीडित मुलगी केवळ १६ वर्षांची होती. त्यामुळे भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलमांसह ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे.
यापूर्वीही वादात अडकला होता दयाल –
यश दयाल यापूर्वी दोन वर्षांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कथित सांप्रदायिक कंटेट पोस्ट केल्याने वादात सापडला होता. त्या वेळी त्याने स्पष्ट केले होते की, ती पोस्ट त्यानी स्वतः केली नव्हती. या प्रकरणात पुढील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होणार असून, यश दयालच्या भवितव्यावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.





