Rajasthan accident। राजस्थानमध्ये आज आणखी एका मोठ्या रस्ते अपघाताने लोकांना हादरवून टाकले. जयपूरच्या हरमन भागात एका अनियंत्रित डंपर ट्रकने ३०-४० वाहनांना धडक दिली. डंपरचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला आणि त्यात सात जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान , डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याचेही सांगण्यात येत आहे. Rajasthan accident। घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ब्रेक निकामी झाल्यानंतर डंपरने सुमारे ४० चारचाकी आणि दुचाकींना धडक दिली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर अनेक जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. जखमींवर शहरातील एसएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसएमएस रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे आणि मृतांचा आकडा वाढू शकतो. Rajasthan accident।