ठाण्यात राज ठाकरेंचे मनसैनिक निवडणुकीच्या रिंगणात; मनसेची पहिली यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?

Thane Municipal Corporation Election : आज सकाळपासूनच मुंबईसह राज्यातील महत्वाच्या सर्वच महापालिकांच्या उमेदवारांच्या नावांच्या याद्या समोर येत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने राजकीय पक्षांनी उमेदवारांना एबी फॅार्मचे वाटप सुरू केले आहे. ठाण्यात महाविकास आघाडी म्हणून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक मैदानात उतरविण्याचे ठरवले असून, ठाणे महापालिकेसाठी मनसेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
या यादीत १४ जणांच्या नावाचा समावेश असून त्यांची नावे समोर आली आहेत. ठाण्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि मनसे एकत्रितरित्या निवडणूक लढवत आहेत. मात्र, जागावाटपाचा फॅार्म्युला काय आहे याची माहिती समोर आलेली नसताना मनसेने मात्र त्यांच्या उमेदवारांना एबी फॅार्म देण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ जणांना मनसेचे नैनेश पाटणकर ठाणे पालघर जिल्हा सचिव यांच्याकडून एबी फॉर्मच वाटप करण्यात आले आहे. याच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. यापैकी सात जणांची नावे समोर आलेली आहेत.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मनसेकडून अनेक नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. २४ जणांची उमेदवारांची उमेदवारी निश्चित मानली जात असून अजूनही १० ते १२ जणांना देखील एबी फॅार्म मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने हाचलालींना वेग प्राप्त झाला आहे. याबाबत मनसे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी माहिती दिली आहे.
ठाण्यातील मनसेच्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:
रवींद्र मोरे – प्रभाग क्रमांक 2
निलेश चव्हाण- प्रभाग क्रमांक 3
पुष्कर विचारे – प्रभाग क्रमांक 5
सचिन कुरेल- प्रभाग क्रमांक 8
सविता मनोहर चव्हाण – प्रभाग क्रमांक 20
संगीता जोशी- प्रभाग क्रमांक- 21
रश्मी सावंत प्रभाग क्रमांक – 16
हेही वाचा : प्रभासने केलं संजय दत्तच तोंडभरून कौतुक; ‘ती’ आठवण शेअर करत म्हणाला “चित्रपटाच्या डबिंगच्या वेळी…”





