Raj Thackeray Family News : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरात आनंदीआनंद; नव्या पाहुण्याचे झाले आगमन
Raj Thackeray Family News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा आजोबा झाले आहेत. अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले असून ठाकरे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

Raj Thackeray Family News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. त्यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. अमित आणि मिताली यांना कन्यारत्न प्राप्त झाले असून, त्यामुळे ठाकरे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
अमित आणि मिताली ठाकरे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. यापूर्वी 5 एप्रिल 2022 रोजी त्यांना मुलगा झाला होता. त्यांच्या मुलाचे नाव कियान आहे. आता त्यांच्या कुटुंबात मुलीचे आगमन झाले आहे.
कोण आहेत मिताली ठाकरे?
अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली बोरूडे या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी एफएडी इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. काही वर्षांपूर्वी मिताली आणि राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे यांनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रँड सुरू केला. मिताली आणि उर्वशी या मैत्रिणीही आहेत.
अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह 27 जानेवारी 2019 रोजी झाला. मुंबईतील लोअर परळ येथील सेंट रेजिस हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.





