Raj Thackeray : फोडाफोडीच्या राजकारणावरून राज ठाकरेंचा संताप; म्हणाले…
महाराष्ट्रातील दूष्काळी परस्थिती, पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे.

Raj Thackeray : महाराष्ट्रातील दूष्काळी परस्थिती, पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्याकडे अजून पाऊस झालेला नाही. राज्यात दुष्काळी परिस्थिती येणार आहे, अशी स्थिती असताना आमच्याकडे खासदार, आमदार, नगरसेवक फोडणे सुरु असल्याचे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, आमची सत्ता कशी टिकेल, त्यासाठी वाटेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, माणसे विकली जात आहेत. ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही चार, पाच तास उन्हामध्ये रांगेत उभे राहिला तो माणूस 50-100 कोटींसाठी विकले जातात. यावर एक जुन वाक्य आहे ते, स्वाभिमान मेला ना की उठतात फक्त जिवंत प्रेतं, अशा शब्दात ठाकरे यांनी हल्ला चढवला.
ठाकरे (Raj Thackeray) पूढे म्हणाले, भाजपमध्ये सुद्धा आतून पेटले असून ज्वालामुखी झाला आहे. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा ही माझी इच्छा आहे, पण ते करताना हातामध्ये सत्ता आणि 20 वर्षांपूर्वीचे राजकारण आणि आत्ताचे राजकारण यात जमीन अस्मानचा फरक आहे. निवडणुका ही गोष्ट इतक्या प्रोफेशनल लेवलवर आली आहे की, यांच्याकडे दुर्लक्ष करण्यामुळे आपण आयुष्यातील पाच पाच वर्ष घालवत आहोत.
सत्तेचा मार्ग हा मतदारयादीत जातो. खरा मतदार कोण आहे, खोटा मतदार कोण आहे, खोट्या मतदारांवर तुम्ही ऑब्जेक्शन घेतले पाहिजे. जनगणना सुरू होत आहे. हे करताना त्या अधिकाऱ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे लोक होते. गप्पा मारता मारता बोलता बोलता त्यांना अंदाज येतो की हा आपला मतदार नाही, नोंद करून ठेवतात आणि ज्यावेळी हे कापले जातील त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरा मार्ग नसेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
तसेच, निवडणूक प्रक्रियेकडे तुमचे संपूर्ण दुर्लक्ष होऊन फक्त तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्याचे काम सुरू आहे का? मला अस वाटत हे पण तुम्ही तपासणRaj Thackeray गरजेचे आहे. आज बेरोजगारीचं प्रमाण इतक प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढले आहे की आपले लक्ष नाही. शेतकरी आत्महत्या करतात, विद्यार्थी आत्महत्या करतात, नीटचे पेपर फुटतात, लहान मुले पळवली जातात, मुली पळवल्या जात आहेत, त्यांचे व्यापार होत आहेत.
लाडकी बहिण योजना आणली तेव्हा मी सांगत होतो महिलांच्या सक्षमीकरणाकडे जास्त लक्ष द्या. दर महिन्याला पैसे देण्याची गरज नाही. फुकटची गोष्ट दिल्यावर राज्य चालू शकत नाही, देश चालू शकत नाही. तुमच्या मतांसाठी ज्या फुकट गोष्टी करायला लागतात त्याला बाकीच्या ठिकाणून गोष्टी ओरबाडून काढावे लागतात. तुम्हाला एक रुपया द्यायचा आणि तुमच्याकडे 10 रुपये ओरबाडून काढायचे, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.






