Samrat Choudhary : पाटणा येथे सत्तरच्या दशकात उभारण्यात आलेल्या संजय गांधी बोटॅनिकल गार्डनच्या नावातून संजय गांधी यांचे नाव हटवण्यात आले आहे. हे उद्यान आता पूर्वीच्याच पाटणा प्राणीसंग्रहालय आणि वनस्पती उद्यान या नावानेच ओळखले जाईल. हा निर्णय नवनिर्वाचिता मुख्यमंत्री सम्राट चौधरी (Samrat Choudhary) यांनी घेतला. चौधरी यांच्या नेतृत्वाखालील बिहारमधील नवीन भाजप-प्रणित सरकार सक्रियपणे मोठे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्रीपदाची (Samrat Choudhary) सूत्रे स्वीकारल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत, २९ एप्रिल रोजी, सरकारने आपली दुसरी मंत्रिमंडळ बैठक घेतली. या बैठकीत एकूण ६४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. पाटण्याच्या प्राणीसंग्रहालयाचे नाव बदलण्याचा निर्णय हा त्यातील एक महत्त्वाचा निर्णय होता. Sanjay Gandhi Botanical Garden पाटणा येथे आज अस्तित्वात असलेले प्राणीसंग्रहालय आणि वनस्पती उद्यान १९६९ मध्ये स्थापन झाले. बिहारचे तत्कालीन राज्यपाल, नित्यानंद कानूनगो यांनी गव्हर्नर हाऊसमधून ३४ एकर जमीन उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर, १९७२ मध्ये, उद्यानासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ५८.२ एकर आणि महसूल विभागाकडून ६०.७५ एकर जमीन संपादित करण्यात आली. ही जमीन विस्तारासाठी वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आली. यानंतर, १९७३ मध्ये, या उद्यानाचा जैविक उद्यान म्हणून विकास करण्यास सुरुवात झाली. वनस्पती उद्यानासोबतच एक प्राणीसंग्रहालयही बांधण्यात आले. १९८० मध्ये, या उद्यानाचे नाव बदलून संजय गांधी जैविक उद्यान असे ठेवण्यात आले. हे बिहारमधील (Samrat Choudhary) एकमेव जैविक उद्यान आहे. येथे सुमारे ११० प्रजातींचे ८०० हून अधिक प्राणी आहेत आणि वनस्पती उद्यानात ३०० हून अधिक प्रकारच्या वनस्पती आणि औषधी वनस्पती आढळतात.