Dussehra-Diwali : दसरा-दिवाळीसाठी आत्ताच रेल्वे गाड्या फुल्ल !
Updated On:

Dussehra-Diwali – देशभरात सणांचा काळ सुरू झाला असून यंदा दसरा २ ऑक्टोबरला तर दिवाळी २२ ऑक्टोबरला आहे. यासाठी रेल्वेचे तिकीट आतापासूनच फुल्ल झाले आहे. सणाला बराच अवधी असला तरी मुंबईसह राज्यातील प्रमुख रेल्वेगाड्यांचे आरक्षण काही मिनिटांतच फुल्ल झाले आहे.
परिणामी बहुतेक गाड्यांवर ‘वेटिंग’ किंवा ‘फुल्ल’ असा संदेश प्रवाशांना दिसत आहे. मुंबईतून दसरा-दिवाळीच्या काळात प्रवाशांचा ओढा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह उत्तर भारताकडे असतो.
कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी हजारो बुकिंग प्रवाशांनी वेबसाइट आणि तिकीट काउंटरवर प्रयत्न केले; परंतु बुकिंग सुरू होताच काही क्षणांतच सीट बुक झाल्या.





