Nanded Mumbai Express : मराठवाड्यासाठी मोठी भेट! नांदेड-मुंबई आणि टनकपूर-नांदेड या दोन एक्सप्रेसना हिरवा झेंडा
Nanded Mumbai Express : मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आणि देशभरातील शिख भाविकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.

Nanded Mumbai Express : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नांदेड-मुंबई व टनकपूर-नांदेड या दोन नवीन एक्सप्रेस रेल्वेंचा शुभारंभ केला. तसेच टनकपूर-पिलीभीत रेल्वे सेवेचा शाहजहानपूरपर्यंत विस्तारही करण्यात आला. (Nanded Mumbai Express)
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले. या निमित्ताने नांदेड, टनकपूर आणि पिलीभीत रेल्वे स्थानकांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. (Nanded Mumbai Express)
उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, टनकपूर-नांदेड एक्सप्रेसची सुरुवात ही जनतेच्या दीर्घकाळापासूनच्या अपेक्षांची पूर्तता आहे. ही नवीन रेल्वे सेवा उत्तराखंड आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करेल तसेच नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी सुविधा ठरेल. (Nanded Mumbai Express)
नांदेड-मुंबई एक्सप्रेसमुळे मराठवाडा परिसरातील, विशेषतः वाशीम, हिंगोली आणि बसमत येथील प्रवाशांना मुंबईशी अधिक सुलभ रेल्वे संपर्क उपलब्ध होईल. गेल्या 12 वर्षांत भारतीय रेल्वेने 37,000 किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात आले असून रेल्वे जाळ्याचे 99.6 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. (Nanded Mumbai Express)

बुलेट ट्रेन प्रकल्प तसेच समर्पित मालवाहतूक मार्ग वेगाने प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी नमूद केले. मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारा व सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी विविध राज्यांमध्ये सातत्याने नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (Nanded Mumbai Express)
यावर्षी जून महिन्यापर्यंत उन्हाळी हंगामात 15,000 हून अधिक विशेष रेल्वे चालविण्यात आल्या असून, दिवाळी आणि छठ उत्सवादरम्यान सुमारे 12,000 विशेष गाड्या चालविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही नवीन रेल्वे सेवांच्या प्रारंभाबद्दल जनतेचे अभिनंदन केले. (Nanded Mumbai Express)





