पुण्यात गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे
Updated On:

पुणे –जळगावमधील एक शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संस्थेच्या संचालकाचे अपहरण व खंडणीप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात मागील वर्षी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणातील महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या पाच जणांच्या घरी पुणे पोलिसांच्या पथकाने छापा टाकला, त्यानंतर रविवारी रात्री उशीरापर्यंत पाचही जणांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरु होते.
ऍड.विजय पाटील (वय 52) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात जानेवारी 2021 मध्ये फिर्याद दिली होती. त्यावरुन गिरीश दत्तात्रेय महाजन (रा. जामनेर, जळगाव), तानाजी भोईटे (रा. कोंढवा), नीलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे (रा. भोईटेनगर जळगाव) यांच्यासह 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.





