Rahul Gandhi : राहुल गांधींचे ‘आस्क मी एनीथिंग’ सत्र चर्चेत; जेन-झी सोबतच्या संवादाने वेधले लक्ष
'जनरेशन झेड'शी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या 'आस्क मी एनीथिंग' या इन्स्टाग्राम सत्रात आपल्या दिलखुलास आणि मिश्कील उत्तरांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Rahul Gandhi – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री ‘जनरेशन झेड’शी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या ‘आस्क मी एनीथिंग’ या इन्स्टाग्राम सत्रात आपल्या दिलखुलास आणि मिश्कील उत्तरांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
एका युजरने विचारलेल्या, तुम्ही बॅटमॅन आहात का? या प्रश्नावर, ‘कॅपेड क्रुसेडर’शी तुलना टाळत त्यांनी, असं समजा की मला आणि बॅटमॅनला आजवर कोणीही एकाच खोलीत एकत्र पाहिलेले नाही, असे मिश्किल उत्तर दिले.
या संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी अनेक गंभीर आणि अनौपचारिक प्रश्न विचारले. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाबाबत बोलताना, तरुणांच्या मागण्या प्रत्येक सरकारने ऐकल्या पाहिजेत, असे मत त्यांनी मांडले. (Rahul Gandhi)
भाजपमधील आवडत्या राजकारण्याबद्दल विचारले असता, त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव घेत ते ‘कूल’ असल्याचे सांगितले. तसेच आईचा ‘नूरी’ नावाचा कुत्राही त्यांनी या लाईव्ह स्ट्रिमिंगमध्ये आवर्जून दाखवला. (Rahul Gandhi)

Rahul Gandhi : राहुल गांधींचे ‘आस्क मी एनीथिंग’ सत्र चर्चेत; जेन-झी सोबतच्या संवादाने वेधले लक्ष
दरम्यान, राजकीय प्रश्नांवरही त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. गेल्या महिन्यातील विद्यार्थी आंदोलनावेळच्या मीमबद्दल विचारले असता, मध्यरात्री पंतप्रधान निवासस्थानातून समोर आलेले व्हिडिओ सर्वोत्तम होते, ज्यात एक ‘नवीन आणि घाबरलेले पंतप्रधान’ दिसत होते, अशी टीका त्यांनी केली. (Rahul Gandhi)
तसेच, संविधानाला आकार देणाऱ्या भगवान बुद्ध, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर ते महात्मा गांधींपर्यंतच्या सर्व महापुरुषांच्या विचारसरणीत आपल्याला रस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Rahul Gandhi)
गेल्या महिन्यात नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी झालेल्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांशी सतत संवाद साधत असलेल्या राहुल गांधींच्या या डिजिटल उपक्रमाने सोशल मीडियावर मोठी चर्चा घडवून आणली आहे.




