“राहुल गांधींचे आरोप निराधार आणि चुकीचे…” – निवडणूक आयोग
Updated On:

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप तातडीने फेटाळून लावले. कुठल्याही नागरिकाला ऑनलाइन पद्धतीने मत वगळता येत नाही. राहुल यांनी केलेले आरोप निराधार आणि चुकीचे आहेत, अशी प्रतिक्रिया आयोगाने दिली. संबंधित व्यक्तीला म्हणणे मांडण्याची संंधी दिल्याशिवाय मत वगळले जाऊ शकत नाही, अशी पुस्तीही आयोगाने जोडली.
कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात २०२३ यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदारांची नावे वगळण्यासाठी काही अयशस्वी प्रयत्न झाले. त्या प्रकरणी तपास व्हावा यासाठी आयोगाच्या वतीनेच गुन्हा दाखल होण्याच्या उद्देशातून पाऊले उचलली गेली. आलंद मतदारसंघात २०१८ मध्ये भाजपने, तर २०२३ मध्ये कॉंग्रेसने विजय मिळवला, याकडेही निवडणूक आयोगाने लक्ष वेधले.





