Rahul Gandhi : राहुल गांधी दोन दिवसीय गुजरात दौरा करणार; अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा
Updated On:

Rahul Gandhi – कॉंग्रेस नेते राहुल गांधी ७ मार्चपासून गुजरातचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. त्या दौऱ्यावेळी ते अहमदाबादमध्ये पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पुढील महिन्यात कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन गुजरातमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
त्याआधी होणाऱ्या राहुल यांच्या दौऱ्याचे महत्व वाढले आहे. चालू वर्षी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध पाऊले उचलण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. त्या प्रक्रियेचा फोकस गुजरातवरही राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य आहे. त्या राज्यात कॉंग्रेसने संघटनात्मक पातळीवर विविध कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे. त्याचाच भाग म्हणून राहुल यांच्या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.





