Rahul Gandhi On PM Modi :”साडेचार कोटींपेक्षा अधिक नोकऱ्या आणि लाखो व्यवसाय धोक्यात”; टॅरिफवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
Rahul Gandhi On PM Modi | डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे अमेरिका आणि भारतामधील व्यापार संबंधात तणाव निर्माण झाला आहे. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

Rahul Gandhi On PM Modi | अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा रुजू झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सातत्याने धक्कादायक निर्णय घेत आहेत. रशियाकडून स्वस्त दरात खनिज तेलाची आयात भारत करत असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादलेलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिका आणि भारतामधील व्यापार संबंधात तणाव निर्माण झाला आहे. यावरूनच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी हरियाणातील गुरुग्रामजवळील एका वस्त्रोद्योग कारखान्याला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कामगार आणि व्यवस्थापनाशी संवाद साधला. या दौऱ्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला.
यावेळी त्यांनी अमेरिकन टॅरिफमुळे भारतातील ४.५ कोटींपेक्षा अधिक नोकऱ्या आणि लाखो व्यवसाय धोक्यात असल्याचा दावा करत यासाठी पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी ?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये राहुल गांधींनी म्हटलं की, “अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे भारतातील कापड क्षेत्रात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. कापड निर्यातदारांचं ५० टक्के अमेरिकन टॅरिफ आणि अनिश्चितता यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेकांनी नोकऱ्या गमावणं, उद्योग व्यवसायाचे कारखाने बंद होणं आणि ऑर्डरमध्ये घट ही आपल्या ‘डेड इकॉनॉमी’ची वास्तविकता आहे.”
पंतप्रधान मोदींनी कोणताही दिलासा दिलेला नाही किंवा अमेरिकन टॅरिफबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, जेव्हा साडेचार कोटींपेक्षा अधिक नोकऱ्या आणि लाखो व्यवसाय धोक्यात आहेत. पण या सर्व गोष्टींना फक्त मोदीच जबाबदार असून कृपया याकडे लक्ष द्या”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
50% US tariffs and uncertainty are badly hurting India’s textile exporters. Job losses, factory shutdowns and reduced orders are a reality of our ‘Dead Economy’.
Mr. Modi has offered no relief or even spoken about tariffs, even though more than 4.5 crore jobs and lakhs of… pic.twitter.com/5BcG3AZibg
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 23, 2026
राहुल गांधी (Rahul Gandhi ) पुढे म्हणाले, ‘भारतातील वस्त्रोद्योग हा रोजगार निर्मितीच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठे क्षेत्र आहे. भारतीय कपड्यांना जगभर मागणी आहे आणि आपल्या कारागिरांच्या कौशल्याला तोड नाही. अमेरिकेने सुमारे ५० टक्के टॅरिफ लावला आहे. Rahul Gandhi On PM Modi |
युरोपमध्ये किमती घसरत आहेत, बांगलादेश आणि चीनकडून तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे भारतीय वस्त्रोद्योग आणि निर्यातदार सर्व बाजूंनी पिळले जात आहेत. याचा थेट परिणाम रोजगारावर होत असून, कारखाने बंद पडत आहेत, ऑर्डर कमी होत आहेत आणि संपूर्ण क्षेत्रात अस्थिरता पसरली आहे’, असेही राहुल गांधींनी नमूद केले. Rahul Gandhi On PM Modi |
हेही वाचा:






