‘अपयश आणि असंवेदनशील’, दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राहुल गांधींची सरकारवर जोरदार टीका

New Delhi Railway Station Stampede | उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महिन्याभरापासून महाकुंभमेळा सुरू आहे. कोट्यावधी भाविक या धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहत आहेत. मात्र, भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 18 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाकुंभासाठी येथून दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यातून प्रवास करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. ही गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यावर आता काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ही घटना म्हणजे रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता असल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
या घटनेवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांच्या मृत्यूची आणि अनेकांच्या जखमी होण्याची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या प्रति मी माझी संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकरात लवकर बरे होतील आशा व्यक्त करतो.’
नई दिल्ली रेलवे स्टेशन पर भगदड़ मचने से कई लोगों की मृत्यु और कईयों के घायल होने की ख़बर अत्यंत दुखद और व्यथित करने वाली है।
शोकाकुल परिवारों के प्रति अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं और घायलों के शीघ्र स्वस्थ होने की आशा करता हूं।
यह घटना एक बार फिर रेलवे की नाकामी और सरकार…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 16, 2025
ही घटना पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता स्पष्ट करते. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता स्टेशनवर योग्य नियोजन करायलाहवे होते. सरकार आणि प्रशासनाने हे सुनिश्चित करावे की अव्यवस्था आणि निष्काळजीपणामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
दरम्यान, या घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी निवेदन जारी केले आहे. प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म 14 वर उभी असताना, प्लॅटफॉर्मवर बरीच गर्दी झाली. स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानीला उशीर झाल्याने आणि या गाड्यांचे प्रवासी देखील प्लॅटफॉर्म क्रमांक 12,13 आणि 14 येथे उपस्थित होते. सीएमआयनुसार रेल्वेने दर तासाला 1500 सामान्य तिकिटे विकली, म्हणून गर्दी अनियंत्रित झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 जवळ एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली.





