Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रकरणाच्या सुनावणीला स्थगिती
Updated On:

सुल्तानपूर – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी संबंधित मानहानी प्रकरणाच्या सुनावणीला शुक्रवारी स्थगिती देण्यात आली. गांधींच्या वकिलांनी अतिरिक्त वेळ मागितल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले.
न्यायालयात साक्षीदार रामचंद्र दुबे यांची उलटतपासणी प्रस्तावित होती. मात्र राहुल गांधींचे वकील काशी प्रसाद शुक्ला यांनी वेळ मागितल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. याआधी ९ डिसेंबरला सुनावणी झाली होती.
मानहानीचा हा खटला २०१८ असून स्थानिक भाजप नेते विजय मिश्रा यांनी राहुल गांधींविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांच्यानूसार कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले असल्याचा आरोप आहे.





